रवींद्र वानखडे, पुणे. `छाटितो गप्पा` आज वाचुन झाले. खुप छान लिहिले आहे. लेखकाशी प्रत्यक्ष गप्पाच मारतोय असे वाटले. काही भावुक गोष्टी मनाला हळवं करून गेल्या. विदर्भातील वर्हाडी भाषा आपसूकच आपली असल्याची जाणीव होत राहते. मनातील भाव व्यक्त करण्यास ती अधीक सक्षम असल्याच दिसून येते. लेखकाने असेच लिखाण सुरू ठेवून सर्वांना आनंद देत राहावा. आता पुढील पुस्तकाची प्रतिक्षा आहे. ...Read more
अनील सहजे, नाशिक. `महारुद्र` वाचून झालं. भीमरावांच्या व्यक्तित्वाचं कौतुक करू की लेखकाच्या लिखाणाचं ह्या विचारात पडायला झालं. पण एकाचंच का? अतिशय उत्तम कामगिरी लेखकाच्या हातून घडली आहे. ओघवत्या पाण्यासारखं, खळाळतं असं हे लेखन आहे.