A. P. KHARAT

About Author

Birth Date : 15/07/1936


PRINCIPAL ANANTRAO PANDURANG KHARAT WAS BORN IN A SMALL VILLAGE KHARATWADI (T. VALWA, DIST. SANGLI) IN A FARMING FAMILY. HE RECEIVED THE PROF.GANGUNANA KANETKAR AWARD FOR SECURING FIRST RANK IN B.ED FROM PUNE UNIVERSITY IN 1962. HE ALSO STOOD FIRST IN M.ED EXAM FROM SHIVAJI UNIVERSITY IN 1965. HE IS A RED RIBBON AWARDEE IN THE D.P.ED. COURSE.

प्राचार्य अनंतराव पांडुरंग खरात यांचा जन्म खरातवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) या छोट्या खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला. 1962 मध्ये पुणे विद्यापीठाच्या बी.एड. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांना प्रा. गंगूनाना कानेटकर पारितोषिक मिळाले. 1965 मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या एम.एड. परीक्षेत त्यांना प्रथम क्रमांक मिळाला. डी.पी.एड. कोर्समध्ये ते ’रेड रिबन’चे मानकरी आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत व महाविद्यालयांत अध्यापनाचा त्यांचा अडतीस वर्षांचा अनुभव आहे. शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक संशोधन, शैक्षणिक प्रशासन व शारीरिक शिक्षण या विषयांच्या अध्यापनात विशेष रस. चौदा वर्षे प्राचार्य म्हणून प्रशासकीय कामाचा त्यांना अनुभव आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय विभागात इंटर्नल ऑडिटर म्हणून त्यांनी तीन वर्षे काम केले आहे. ते रयत शिक्षण संस्थेचे निवृत्त आजीव सेवक आहेत. निवृत्तीनंतर रयत प्रिंटिंग प्रेसचे मानसेवी व्यवस्थापक म्हणून त्यांनी काही वर्षे सेवा केली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SHARYATI SPARDHA KHEL Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more