राजेंद्र देशमुख, अमरावती. जी. बी. देशमुख यांनी लिहीलेले "छाटितो गप्पा " हे पुस्तक वाचायला घेतले. थोडा वेळ वाचन करु हा उद्देश होता. पुस्तक वाचण्यास सुरूवात केली. या पुस्तकामध्ये ४५ वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये लेखकाने केलेली मांडणी वाखाणण्या जोगी आहे. प्रत्येक ोष्ट वाचण्यास सुरूवात केल्या पासुन ती संपेपर्यंत तिच्या मधील उत्कंठा क्षणोक्षणी वाढत जाते. विषयाचा शेवट होईपर्यंत वाचन बंद करण्याची इच्छा होत नाही. प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी काहीही संबंध नाही. लेखकाने शब्दांची अशी मांडणी केली आहे की प्रत्येक घटना आपला समोर घडत आहे व आपण त्याचे साक्षीदार आहोत अश्या प्रकारचा जिवंतपणा जाणवतो. `तोंडाचा कुंचला` ह्या गोष्टितील खर्रा व पान खाऊन, पीचकारी मारून रस्ते रंगवण्याच्या गुणाचे
असेही वर्णन होऊ शकते हे कल्पनेच्या पलिकडचे आहे. ४५ गोष्टी पूर्ण होईपर्यंत वाचन सोडण्याची माझी इच्छा झाली नाही. मधे काही कामानिमीत्य ब्रेक घ्यावा लागला, तरी पण `ब्रेक के बाद` परत वाचन सुरू करून पुस्तक पूर्ण होई पर्यंत सोडले नाही.
शब्दांमधे जिवंतपणा आणल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. ...Read more