AJIT THAKUR

About Author


AJIT R.THAKUR IS A B.TECH ( ELECTRICAL) FROM IIT MUMBAI, MBA FROM PUNE UNIVERSITY , SANSKRIT BHASHABHIDNYA FROM TILAK VIDYAPEETH AND HAS ALSO A DIPLOMA IN FRENCH FROM PUNE UNIVERSITY. HE HAS HAD DIVERSE INTERNATIONAL INDUSTRIAL EXPERIENCE AND HAS VISITED OVER 37 COUNTRIES FOR BUSINESS AND PLEASURE. AFTER RETIREMENT HE HAS SETTLED DOWN IN PUNE AND IS A FULL-FLEDGED WRITER AND TRANSLATOR. HE HAS TRANSLATED SEVERAL ENGLISH BOOKS FOR MEHTA PUBLISHERS INCLUDING THE DA VINCI CODE. INDIA IN SLOW MOTION, LET’S KILL GANDHI, SONS OF FORTUNE ETC. HIS TRANSLATIONS IN MARATHI, HINDI AND ENGLISH TOTAL 30 IN NUMBER. MR THAKUR HAS ALSO PENNED 28 GUIDES IN ENGLISH AND MARATHI FOR COLLEGE STUDENTS TAKING HIS TOTAL TALLY OF BOOKS TO 58 SO FAR.

श्री अजित ठाकूर हे आय आय टी मुंबईचे बी टेक आणि पुणे विद्यापीठाचे एम बी ए आहेत. त्यांचेकडे टिळक विद्यापीठाची संस्कृतभाषाभिज्ञ ही पदवी आणि पुणे विद्यापीठाचा फ्रेंच डिप्लोमाहि आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय औद्योगिक क्षेत्रात वीस वर्षाहूनहि अधिक काळ काम केले आहे आणि व्यवसाय/पर्यट्नासाठी त्यांनी 37 देशांना आजवर भेटी दिल्या आहेत. निवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक झाले आहेत व पूर्णवेळ लेखक आणि भाषांतरकार म्हणून व्यस्त आहेत. त्यांनी मेहता पब्लिकेशन्स साठी बर्‍याच इंग्रजे पुस्तकांचे भाषांतर केले आहे त्यात दा विंची कोड, इंडिया इन स्लो मोशन, लेट्स किल गांधी, सन्स ऑफ फॉर्चून आदि पुस्तकांचा समावेश आहे. त्यअ‍ॅंची एकूण 30 भाषांतरित पुस्तके आहेत, शिवाय त्यांनी कॉलेज विद्यार्थ्यांसाठी मराठी वा इंग्रजीमध्ये 28 गाइड पुस्तके लिहिली आहेत. एकूण त्यांच्या नावावर 58 पुस्तके आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
CITY OF BONES Rating Star
Add To Cart INR 450
TBC Classic Book
SONS OF FORTUNE Rating Star
Add To Cart INR 500
TBC Classic Book
THE ATTORNEY Rating Star
Add To Cart INR 350
TBC Classic Book
THE DA VINCI CODE Rating Star
Add To Cart INR 400
TBC Classic Book

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more