ALLAN PEASE, BARBARA PEASE

About Author


EIGHT OF THE FOURTEEN BOOKS AUTHORED BY ALAN AND BARBARA PEASE HAVE BECOME BESTSELLERS. HIS WORKS HAVE BEEN PUBLISHED IN FIFTY LANGUAGES ​​AND REACHED READERS IN NEARLY A HUNDRED COUNTRIES. MORE THAN TWO CRORE COPIES OF HIS BOOKS HAVE BEEN SOLD SO FAR. THE BOOK WRITTEN BY BOTH OF THEM WHY MEN DONT HAVE A CLUE AND WOMEN ALWAYS NEED MORE SHOES IS ALSO AT THE PEAK OF POPULARITY.

अ‍ॅलन आणि बार्बरा पीस यांनी लिहिलेल्या एकूण चौदा पुस्तकांपैकी आठ बेस्टसेलर ठरली आहेत. त्यांचे साहित्य पन्नास भाषांमध्ये प्रसिद्ध होऊन जवळजवळ शंभर देशांतील वाचकांपर्यंत पोहोचले आहे. त्यांच्या पुस्तकांच्या दोन कोटींहून अधिक प्रती आतापर्यंत विकल्या गेल्या आहेत. या दोघांनी लिहिलेले व्हाय मेन डोन्ट हॅव अ क्लू अ‍ॅण्ड विमेन ऑल्वेज नीड मोअर शूज हे पुस्तकही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अ‍ॅलन पीस हे जन्माने ऑस्ट्रेलियन असून व्यवसायानिमित्त तीस देशांमध्ये त्यांचे सतत भ्रमण चालू असते. यशस्वी होण्याचा मंत्र ते गेली तीस वर्षे जगाला शिकवीत आहेत. सहा बीबीसी सायन्सच्या कार्यक्रमांचा विषय ते करीत असलेले कार्य हा आहे. बार्बरा पीस या अनेक बेस्टसेलर पुस्तकांच्या लेखिका व सहलेखिका आहेत. त्या ऑस्ट्रेलियन तरुणांना बॉडी लँग्वेज व संभाषण कौशल्ये शिकवतात. त्या अत्यंत यशस्वी मॉडेल व विक्री क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत. आपल्या पुस्तकातील माहिती अचूक व परिपूर्ण असावी यासाठी हे दोघे भरपूर मेहनत घेतात. त्यासाठी ते देशोदेशीच्या एक्स्पर्ट्सना भेटतात, लोकांच्या मुलाखती घेतात, सेमिनार्स घडवून आणतात. म्हणूनच त्यांची पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
WHY MEN DON’T LISTEN AND WOMEN CAN’T... Rating Star
Add To Cart INR 140

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे... अमरावती-पुणे

जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचनात आले आणि वैदर्भीय भाषेत उत्स्फूर्त प्रतिक्रिया द्यावीशी वाटली ती म्हणजे -`अरे भल्ल्या मस्त आहेत बॉ या गप्पा!` प्रापंचिक, कार्यालयीन कामकाजातील गमतीजमती, आलेले बाका प्रसंग अशा ४५ कथांचा समावेश असलली ही मेजवानी खूपच रुचकर झालेली आहे. त्यात वैदर्भीय भाषेच्या लहेज्याची फोडणी पडल्यामुळे गप्पा अजूनच स्वादिष्ट ! प्रत्येक कथाप्रसंगांना समर्पक शीर्षक हे सुद्धा या पुस्तकाचे वैशिष्ट्ध ! आपल्या व्यक्तिगत जीवनात घडलेल्या गमतीशीर, भावनिक प्रसंगांची आठवण ह्या गप्पा करून देतात. यातील सर्वोत्तम भावनिक साद घालणाऱ्या कथा म्हणजे `गव्हातले खडे` आणि `पुरणामागची वेदना.` लहानपणी सिनेमा बघण्यासाठी पैसे जमवण्याची धडपड अर्थातच `हेराफेरी` वगैरे उत्तमच... मजेशीर... सर्व कथा वाचून पूर्ण झाल्यावर एक विचार मनात आला तो म्हणजे ह्या कथाप्रसंगांचा एक स्वतंत्र `गप्पांच्या मैफिली`चा किंवा `स्टैंड अप कॉमेडी` कार्यक्रम होऊ शकतो. हे पुस्तक वाचकांनी उत्स्फूर्तपणे घेऊन सर्वांनी ह्या गप्पांमध्ये मिसळून जावे हीच विनंती ! जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more

Rajendra Ramchandra Patil

Our earth on the Greatest King and Hindu religion and temple protect.Hindvee swarajay ..!!! The great warrior Mahamrutanjay yodha, Chhawa,ajiky Shrimant Chhatrapati Shambhu Maharaj