AMY NEWMARK

About Author


AMY NEWMARK IS THE BESTSELLING AUTHOR, EDITOR-IN-CHIEF, AND PUBLISHER OF THE CHICKEN SOUP FOR THE SOUL BOOK SERIES. SINCE 2008, SHE HAS PUBLISHED 187 NEW BOOKS, MOST OF THEM NATIONAL BESTSELLERS IN THE U.S. AND CANADA, MORE THAN DOUBLING THE NUMBER OF CHICKEN SOUP FOR THE SOUL TITLES IN PRINT TODAY. SHE IS ALSO THE AUTHOR OF SIMPLY HAPPY, A CRASH COURSE IN CHICKEN SOUP FOR THE SOUL ADVICE AND WISDOM THAT IS FILLED WITH EASY-TO-IMPLEMENT, PRACTICAL TIPS FOR HAVING A BETTER LIFE.

एमी न्यूमार्क लेखिका, वक्त्या म्हणून ओळखल्या जातात. तसेच न्यू यॉर्कमधील शेअर बाजाराच्या विश्लेषक, आर्थिक व दूरसंचार क्षेत्रांत कार्यकारी अधिकारी अशा विविध पदांवरही त्यांनी काम केलं आहे. सध्या त्या ‘चिकन सूप’ या पुस्तकाच्या मालिकेच्या प्रकाशक, मुख्य संपादक आणि सहलेखक म्हणून कार्यरत आहेत. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केली. ब्राझीलमधील प्रसिद्ध मुखोद्गत कवितांवर त्यांनी प्रबंध लिहिला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total

Latest Reviews

TANUJA Bankar

This book is so much informative. The imagination and the way of telling this kind of story is just amazing!!! It doesn`t getting bored to read this. Each page is interesting and About mysterious truth. It`s a pleasure to know about our culture and sme mysterious stories that we don`t know. I just want to Thank you so much dear AKSHAT GUPTA SIR for this wonderful book. #Must read book Lots of good wishes Akshat sir👏😊 ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा.डाॅ. राहुल हांडे .... संगमनेर

"जिसे भी देखिए वो अपने आप मे गुम है जूबा मिली है मगर हुंजुबा नही मिलता कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता..." संज्ञापन व दळणवळण याची अत्यंत वेगवान साधने सहज उपलब्ध असलेल्या आजच्या जगात वावरणाऱ्या माणसाची व्यथा उपरोक्त गझल सहजपणे व्यक्त करून जाते. मणसाच्या जीवनात भौतिक समृद्धीचा अतिरेक झालेला असताना माणसाचा माणसाशी संवाद मात्र क्षीण होत चाललेला दिसतोय. आजचा माणूस मोबाईलवर बोलायला कितीही वेळ देतोय;परंतु प्रत्यक्षात भेटून दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. भौतिक सुख सोयी व संज्ञापन-संपर्क साधनांचा सुळसुळाट आपल्या समाजात झालेला नव्हता तेव्हा एकमेकांशी बोलणं हा मनोरंजनच नव्हे तर एकूण जीवन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी प्रत्येक जणाला त्याच्या सोयीची कंपनी देखील उपलब्ध होती. त्यावेळी माणसाची आर्थिक व भौतिक परिस्थिती दुबळी असली तरी मनस्थिती बळकट होती. आज हे सर्व इतिहास जमा झालेले आहे. असे असताना जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे भारतीय समाजाच्या गप्पामय जीवनाची आठवण पुन्हा ताजी करणारे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशित केले आहे. घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांपासून सुरू झालेल्या या गप्पा कार्यालयीन कामकाजात देखील रंगलेल्या आहेत. सुमारे गेल्या पाच दशकांचा मराठी समाज त्याच्या समग्र वैशिष्ट्यांसोबत ह्या गप्पांमध्ये मनमुराद वावरताना दिसतो. पुस्तकाचे लेखक जी.बी. देशमुख यांचे बोट धरून वाचक जेव्हा ह्या गप्पांच्या आखाड्यात उतरतो तेव्हा हौदातील मातीत केव्हा रंगून जातो याचे भान राहत नाही. माणसाशी माणसाचा संवाद तुटला आहे. अशी तक्रार सतत कानावर पडत असताना `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकवार भोवतालच्या माणसांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच प्रेरित करते. माणसाशी माणसाचा तुटलेला संवाद जोडण्याच्या प्रयत्नांमध्ये जी.बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही. ...Read more