ANDRO LINKLATER

About Author

Birth Date : 10/12/1944
Death Date : 03/11/2013


ANDRO IAN ROBERT LINKLATER WAS A SCOTTISH NON-FICTION WRITER AND HISTORIAN.

अँड्रो लिंकलेटर हे सुप्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ व लेखक असून त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड येथील विन्चेस्टर कॉलेज आणि न्यू कॉलेज येथे झाले. तेथेच त्यांनी आधुनिक इतिहासाचा अभ्यास केला. १९६०च्या दशकात ते अमेरिकेत राहत होते. त्यानंतर ते अध्यापन करण्यासाठी इंग्लंडला परतले. १९७४मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी लेखन करण्यास सुरुवात केली. त्यांनी लिहिलेले अमेरिकेच्या इतिहासावरचे ‘मेजिंरग अमेरिका’ हे पुस्तक लोकप्रिय आहे. याशिवायही त्यांनी इतिहासविषयक पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘द स्पेक्टॅटर’, ‘द संडे टाइम्स’, ‘द गार्डियन’, ‘द डेली टेलिग्राफ’, ‘प्रॉस्पेक्ट मॅगझिन’ आदी नियतकालिकांमधून व दैनिकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
PREMACHI PARIBHASHA Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मेघा ठाकरे-बोंदरे, अमरावती

`छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचून असं वाटतं की लिखाण जर नसानसात भिनले असेल तरच ते इतके सुंदर होऊ शकते. आपण सगळेच कितीतरी गप्पा छाटत असतो, पण शब्दांच्या साथीनं वाचकांचं इतकं मनोरंजन करण्यासाठी लिहायला हाडाची आवड असावी लागते. तीच आवड यातून दिसतेय. यापुस्तकाचा प्रकाशन सोहळा मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. काय, किती, कसं व्यक्त व्हावं ते कळत नव्हतं. अगदी हसून पुरेवाट झाली. आणि एकेक किस्सा असा जणू पुलं किंवा वपू अमरावतीत प्रकट झाले असं वाटत होतं. आमचा एक प्रकारे कपालभाती प्राणायामच झाला होता तेव्हा. खूप फ्रेश वाटलं. निखळ आनंद देणारा हा कथासंग्रह आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more