ANITA NAIR

About Author

Birth Date : 26/01/1966


ANITA NAIR IS AN INDIAN NOVELIST WHO WRITES HER BOOKS IN ENGLISH. SHE IS BEST KNOWN FOR HER NOVELS A BETTER MAN, MISTRESS, AND LESSONS IN FORGETTING.

अनिता नायर ह्या नामांकित भारतीय लेखिका आहेत. त्यांनी आपल्या अनेक पुस्तकांचे लेखन इंग्रजी भाषेत केले आहे. केरळ राज्यातील मुंडाकोट्टाकुरिसी येथे त्यांचा जन्म झाला. चेन्नई (मद्रास) येथून ‘इंग्रजी भाषा आणि साहित्य’ या विषयांत त्यांनी पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी बेंगळरूमधील जाहिरात वंÂपनीत ‘क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळला. त्याच काळात त्यांनी ‘सॅटर ऑफ सबवे’ हा आपला पहिला लघुकथा संग्रह लिहिला. तो पुढे हर-आनंद प्रेसला विवूÂन टाकला. पुढे ह्या लघुकथा संग्रहाला व्हर्जिनिया सेंटरच्या वतीने देण्यात येणारी ‘क्रिएटिव्ह आर्ट’ची पेÂलोशिपही प्राप्त झाली. प्रदीर्घ काळ लेखन केल्यामुळे त्यांची अनेक पुस्तवंÂ पुस्तकाच्या स्वरूपात आकाराला आली. त्यांच्या अनेक कथा आणि कविता संग्रहांना अफाट लोकप्रियता लाभल्यामुळे सर्वाधिक खपाची नोंद आहे. ‘द बेटर मॅन’ ह्या त्यांच्या कादंबरीचा २१ भाषांत अनुवाद झाला आहे. मूळ इंग्रजी भाषांतील त्यांची पुस्तवंÂ देश-विदेशातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. २००० साली ‘द बेटर मॅन’ ह्या पुस्तकाला युरोप आणि अमेरिकेत प्रसिध्दी मिळाली. त्यानंतर २००२ साली ‘मलबार माइंड’ ह्या कविता संग्रहालाही चांगलीच प्रसिध्दी मिळाली. २००१ मध्ये अनिता नायर यांची ‘लेडीज वूÂपे’ ही कादंबरी खूपच गाजली. २००२ सालच्या सर्वोत्कृष्ट पाच कादंबNयांमध्ये ह्या कादंबरीचा समावेश करण्यात आला. वाचनीय अशा ह्या कादंबरीचा जगातील तब्बल २५ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
LADIES COUPÉ Rating Star
Add To Cart INR 290
VISMARNATACHA SARVAKAHI Rating Star
Add To Cart INR 320

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे... अमरावती-पुणे

जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचनात आले आणि वैदर्भीय भाषेत उत्स्फूर्त प्रतिक्रिया द्यावीशी वाटली ती म्हणजे -`अरे भल्ल्या मस्त आहेत बॉ या गप्पा!` प्रापंचिक, कार्यालयीन कामकाजातील गमतीजमती, आलेले बाका प्रसंग अशा ४५ कथांचा समावेश असलली ही मेजवानी खूपच रुचकर झालेली आहे. त्यात वैदर्भीय भाषेच्या लहेज्याची फोडणी पडल्यामुळे गप्पा अजूनच स्वादिष्ट ! प्रत्येक कथाप्रसंगांना समर्पक शीर्षक हे सुद्धा या पुस्तकाचे वैशिष्ट्ध ! आपल्या व्यक्तिगत जीवनात घडलेल्या गमतीशीर, भावनिक प्रसंगांची आठवण ह्या गप्पा करून देतात. यातील सर्वोत्तम भावनिक साद घालणाऱ्या कथा म्हणजे `गव्हातले खडे` आणि `पुरणामागची वेदना.` लहानपणी सिनेमा बघण्यासाठी पैसे जमवण्याची धडपड अर्थातच `हेराफेरी` वगैरे उत्तमच... मजेशीर... सर्व कथा वाचून पूर्ण झाल्यावर एक विचार मनात आला तो म्हणजे ह्या कथाप्रसंगांचा एक स्वतंत्र `गप्पांच्या मैफिली`चा किंवा `स्टैंड अप कॉमेडी` कार्यक्रम होऊ शकतो. हे पुस्तक वाचकांनी उत्स्फूर्तपणे घेऊन सर्वांनी ह्या गप्पांमध्ये मिसळून जावे हीच विनंती ! जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more

Rajendra Ramchandra Patil

Our earth on the Greatest King and Hindu religion and temple protect.Hindvee swarajay ..!!! The great warrior Mahamrutanjay yodha, Chhawa,ajiky Shrimant Chhatrapati Shambhu Maharaj