ANU AGGARWAL

About Author

Birth Date : 11/01/1969


ANU AGGARWAL IS A FORMER INDIAN MODEL AND ACTRESS. SHE IS BEST KNOWN FOR HER WORKS IN AASHIQUI, THE CLOUD DOOR AND THIRUDA THIRUDA.

चित्रपट व मॉडिंलगच्या क्षेत्रात स्वतःची छाप उमटवणा ऱ्या अनू अगरवाल यांना बी.ए.ला सुवर्णपदक मिळाले. सामाजिक शास्त्रात त्यांनी एमबीए ही पदवी प्राप्त केली. मुंबईत वास्तव्यास असताना गोदरेज मार्व्हल साबणाच्या जाहिरातीत त्या मॉडल म्हणून झळकल्या आणि सुपर मॉडल म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली. मॉडलिंगच्या क्षेत्रात त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचल्या. एम टीव्हीवरही त्यांनी काम केलं. १९९०मध्ये ‘आशिकी’ या चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिका केली आणि त्या स्टार बनल्या. ‘क्लाउड डोअर’ या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. तीस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला आणि समीक्षकांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं; मात्र ग्लॅमरच्या शिखरावर असताना त्या मॉडलिंग व चित्रपट क्षेत्रापासून दूर गेल्या आणि योगाश्रमात राहू लागल्या. १९९९मध्ये त्यांना झालेल्या भीषण अपघातानंतर त्या कोमात गेल्या होत्या; पण त्यातून त्या बाहेर आल्या. सध्या अनू त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून स्व-उपचाराच्या मंत्राचा प्रसार करतात. तसेच पाच ते चौदा या वयोगटातील एचआयव्हीबाधित मुलींसाठी त्या काम करतात. मुंबईतील झोपडपट्ट्या हे त्यांच्या समाजकार्याचे क्षेत्र आहे. त्यांनी कॅन्सरवरही संशोधन केले आहे. जगभरातील वैज्ञानिक संशोधन परिषदांमध्ये त्या सहभागी झाल्या आहेत. ‘अनूप’नंतर त्या मुलांमधील सकारात्मक विकास या विषयावर दुसरे पुस्तक लिहीत आहेत. ‘अनू अगरवाल फाउंडेशन’साठी त्यांना ‘ASIA’S BLACK SWAN AWARD’ आणि ‘CSR AWARD’ने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच भारत सरकारतर्फे त्यांना ‘योगा अ‍ॅवॉर्ड’ने गौरवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त अन्यही पुरस्कार त्यांना लाभले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ANUP Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more