APPASAHEB KHOT

About Author

Birth Date : 01/06/1955


"PROF. APPASAHEB YASHWANTRAO KHOT IS A RETIRED PRINCIPAL OF KODOLI HIGH SCHOOL AND VAIDYA BHAI SH. TU. PATIL (APPA) JUNIOR COLLEGE, KODOLI, TAL. PANHALA, DIST. KOLHAPUR. HE IS ALSO FAMOUS AS A RENOWNED STORYTELLER. HE HAS PRESENTED LIVE STORYTELLING AT SANGLI AKASHVANI, E. TV MARATHI, AKHIL BHARATIYA MARATHI SAHITYA SAMMELAN AND HAS A RECORD OF MORE THAN 2000 LECTURES AND STORYTELLING SESSIONS ON VARIOUS TOPICS FOR SOCIAL ENLIGHTENMENT ACROSS MAHARASHTRA. HE HAS WRITTEN VARIOUS COLLECTIONS OF SHORT STORIES SUCH AS `GAVNER,’ `MAHAPUR,’ `RANGANGA,’ ETC.; NOVELS LIKE `PALASPHOOL,’ `GAOPANDHAR,’ `GHARPAN,’ ETC.; LIGHT READING SUCH AS `ANAVANI PAAY,’ `KUNBYACHI PORA,’ AND A BIOGRAPHY ON `DEVMANUS KARMAVEER BHAURAO PATIL’. HE IS THE RECIPIENT OF THE NATIONAL IDEAL TEACHER AWARD IN 2007 AT THE HANDS OF HON. PRESIDENT PRATIBHA PATIL ON SEPTEMBER 5, TEACHERS"" DAY IN DELHI. AT THE SAME TIME, THE COLLECTION OF LIGHT READING ""ANAVANI PAYE"" WAS HONORED WITH THE ADV. TRIMBAKRAO SHIROLE AWARD FROM MAHARASHTRA SAHITYA PARISHAD, PUNE AND MANY OTHER AWARDS! THE STORY ""GHAR ANI BANGLA"" IS INCLUDED IN THE CURRICULUM OF SHIVAJI UNIVERSITY KOLHAPUR, THE STORY ""MATI AND KAGUD"" IN THE CURRICULUM OF SWAMI RAMANAND TIRTH UNIVERSITY, NANDED, AND STORIES LIKE ""GAVLAN"" AND ""KALIJ VIKLYACHI GOSHT"" ARE INCLUDED IN THE SCHOOL AND COLLEGE CURRICULUM AT DR. BABASAHEB AMBEDKAR MARATHWADA UNIVERSITY- CHHATRAPATI SAMBHAJINAGAR! "

"प्रा. आप्पासाहेब यशवंतराव खोत हे कोडोली हायस्कूल व कै. भाई शं. तु. पाटील (आप्पा) ज्युनिअर कॉलेज, कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथील निवृत्त प्राचार्य आहेत. त्याचबारोबर प्रख्यात कथाकथनकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. सांगली आकाशवाणी, ई. टीव्ही मराठी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी कथाकथनाचे प्रत्यक्ष सादरीकरण व महाराष्ट्रभर समाज प्रबोधनासाठी निरनिराळ्या विषयांवर व्याख्याने आणि कथाकथनाचे २०००च्या वरती कार्यक्रमांचा विक्रम. `गवनेर,’ `महापूर,’ `रानगंगा,’ इ. कथासंग्रह; तर `पळसफूल,’ `गावपांढर,’ `घरपण,’ इ. कादंबर्‍या; `अनवाणी पाय,’ `कुणब्याची पोरं,’ यांसारखे ललितगद्य; तर `देवमाणूस कर्मवीर भाऊराव पाटील’ यांच्यावरील चरित्र असे वैविध्यपूर्ण लिखाण त्यांनी केले आहे. सन २००७चा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते, ५ सप्टेंबर या शिक्षकदिनी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर ‘अनवाणी पाय’ या ललितगद्य संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा अ‍ॅड. त्रिंबकराव शिरोळे पुरस्कार व इतर बर्‍याच पुरस्कारांनी सन्मानित! शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अभ्यासक्रमात ‘घर आणि बंगला’ कथा, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील अभ्यासक्रमांत ‘माती आणि कागूद’ कथा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ- छत्रपती संभाजीनगर इथे ‘गवळण’ व ‘काळीज विकल्याची गोष्ट’ यांसारख्या कथांचा शालेय ते महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश! "
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ABIRMATI Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more