ASHOK BIRBAL JAIN

About Author


NA

अशोक बिरबल जैन हे वर्धा येथील प्रथितयश डॉक्टर दाम्पत्य आहे. आपले अद्यायावात ज्ञान व ‘जैन हॉस्पिटल’ या आधुनिक उपकरणांनी सुसज्ज व विविध सुविधा पुरविणाNया रुग्णालयाच्या माध्यमातून ते गेली ३० वर्षे गरजू रुग्णांना आपली सेवा पुरवित आहेत. डॉ. अरुणा या मूळच्या पुण्याच्या असून त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत झाले आहे तर डॉ. अशोक हे मूळचे दिल्लीचे असून त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण देशाच्या राजधानीत झाले आहे. महात्मा गांधींच्या आशीर्वादाने स्वातंत्र्यसेनानी डॉ. सुशिला नायर यांनी सुरू केलेल्या सेवाग्राम येथील मेडिकल कॉलेजमध्ये दोघांनीही आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व पदव्युत्तर शिक्षणानंतर गांधी - विनोबांची पवित्र कर्मभूमी वर्धा येथे आपले रुग्णालय सुरू केले. योगाभ्यास, निसर्गोपचार व वैकल्पिक चिकित्सा यामध्ये दोघांनाही गती आहे. गरजेनुसार रोगनिदान व रोगनिवारणाकरिता ते योग्य उपचारप्रणाली निवडतात. तसेच अनेक शासकीय व अशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाNयांकरिता व शाळा कॉलेजमधील अध्यापक व विद्याथ्र्यांकरिता वैद्यकीय उपचारांसोबत आध्यात्मिक जोड देणारे उपक्रम व कार्यशाळा राबवितात. मधुमेह, हृदयरोग व अस्थमा निवारण वेंÂद्राचे ते संचालक असून या विषयांवरील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ते सहभागी झालेले आहेत. आजपर्यंत विविध वैद्यकीय विषयांवर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग केवळ अर्थाजनासाठी न करता सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी करणारे डॉ. जैन दाम्पत्य आजच्या पिढीसमोर रुग्णसेवेचे आदर्श उदाहरण ठरावे. अधिक माहितीसाठी : E-MAIL - ABJ@LIVE.IN
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MADHUMEHA : EK AAVHAN Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

`छाटीतो गप्पा` पुस्तक माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे ,तसेच त्यात दिलेले अनुभव अविस्मरणीय आहेत. एकदम मस्त.

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more