मेघा ठाकरे-बोंदरे, अमरावती `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचून असं वाटतं की लिखाण जर नसानसात भिनले असेल तरच ते इतके सुंदर होऊ शकते.
आपण सगळेच कितीतरी गप्पा छाटत असतो, पण शब्दांच्या साथीनं वाचकांचं इतकं मनोरंजन करण्यासाठी लिहायला हाडाची आवड असावी लागते. तीच आवड यातून दिसतेय.
यापुस्तकाचा प्रकाशन सोहळा मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. काय, किती, कसं व्यक्त व्हावं ते कळत नव्हतं.
अगदी हसून पुरेवाट झाली.
आणि एकेक किस्सा असा जणू पुलं किंवा वपू अमरावतीत प्रकट झाले असं वाटत होतं.
आमचा एक प्रकारे कपालभाती प्राणायामच झाला होता तेव्हा.
खूप फ्रेश वाटलं.
निखळ आनंद देणारा हा कथासंग्रह आहे.
...Read more
रत्ना सुदामे, ठाणे `छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे.
...Read more