BABARAO MUSALE

About Author

Birth Date : 10/06/1949


BABARAO GANGARAM MUSALE IS A FAMOUS MARATHI POET AND WRITER. IN 1985, HE CAME INTO LIMELIGHT WITH THE NOVEL HALYA HALYA DUDHU DE. THIS NOVEL EARNED HIM RECOGNITION AS A NOVELIST WHO CAPTURED THE RURAL REALITY IN HIS UNIQUE STYLE.

बाबाराव गंगाराम मुसळे हे मराठीतील प्रथितयश कवी आणि लेखक आहेत. १९८५मध्ये हाल्या हाल्या दुधू दे या कादंबरीने प्रसिद्धीच्या झोतात आले. या कादंबरीने ग्रामीण वास्तव आपल्या खास शैलीत टिपणारे कादंबरीकार म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली. त्यांच्या हाल्या हाल्या दुधू दे नंतर आलेल्या पखाल कादंबरीलाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पु.ल. देशपांडे यांनी पखालचे विशेष कौतुक केले होते. दरम्यानच्या काळात बाबाराव मुसळे यांची झुंगु लुखू लुखू, मोहोरलेला चंद, नगरभोजन हे कथासंग्रह आणि पाटीलकी, दंश, स्मशानभोग या कादंबऱ्या प्रकाशित होत राहिल्या तर वारूळ या कादंबरीने पुन्हा एकदा मराठी साहित्यात खळबळ निर्माण केली. वाचक त्यांच्या लेखनशैलीला सरावलेला असतानाच इथे पेटली माणूस गात्रे या कवितासंग्रहाला सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील हा साहित्य पुरस्कार मिळाला आणि बाबाराव मुसळे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. कादंबरी आणि कथालेखन करत असतानाच मुसळे यांचे कवितालेखनही समांतरपणे सुरू होते. त्यांची कविता नागर, ग्रामीण, दलित, आदिवासी असा विविध प्रवाहांना आपल्यात सामावून घेत आपल्या पद्धतीने व्यक्त होते. बाबाराव मुसळे यांना २०२१ चा डाॅ.गिरीश गांधी फाऊंडेशन नागपूर तर्फे स्व.मिरादेवी पिंचा स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 7 of 7 total
21 %
OFF
BABARAO MUSALE COMBO SET - 6 BOOKS Rating Star
Add To Cart INR 2475 INR 1955
HALYA HALYA DUDHU DE Rating Star
Add To Cart INR 260
MOHARLELA CHANDRA Rating Star
Add To Cart INR 350
NO NOT NEVER Rating Star
Add To Cart INR 450
VARUL Rating Star
Add To Cart INR 595
ZINGU LUKHU LUKHU Rating Star
Add To Cart INR 240
ZUND Rating Star
Add To Cart INR 580

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more