BANI BASU

About Author

Birth Date : 11/03/1939


BANI BASU IS A PROLIFIC BENGALI INDIAN AUTHOR, ESSAYIST, CRITIC, POET, TRANSLATOR AND PROFESSOR.

श्राबणी बासू यांचा जन्म कोलकतामध्ये झाला, तर ढाक्का, काठमांडू आणि दिल्ली याठिकाणी त्यांचे बालपण गेले. दिल्लीच्या सेंट स्टिफन कॉलेजमधून त्यांनी ‘इतिहास’ विषयात आपले पदवीचे शिक्षण घेतले. दिल्ली विद्यापीठातून पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले. १९८३मध्ये मुंबईच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. लंडनमध्ये १९८७ साली स्थलांतर केल्यानंतरही त्या कोलकताच्या ‘आनंद बझार पत्रिका’ आणि ‘टेलिग्राफ’ या वृत्तपत्रांच्या प्रतिनिधी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या क्षेत्रात इतिहास आणि पत्रकारिता यांची उत्कृष्ट सांगड घातली होती. त्यांच्या अनेक पुस्तकांमध्येही भारत व ब्रिटनच्या इतिहासाचा संदर्भ आढळतो. ब्रिटनमध्येही त्या मुलाखती आणि विविध कार्यक्रम यांच्या माध्यमातून बीबीसी टेलिव्हिजनवर झळकल्या आहेत. देश-विदेशातील अनेक संमेलनात त्या वक्त्या म्हणूनही सहभागी झाल्या आहेत. श्राबणी यांनी २०१०मध्ये नूर इनायत खान मेमोरिअल ट्रस्टची स्थापना केली. नूर यांनी दुसNया महायुद्धात केलेल्या उल्लेखनीय कार्याची, त्यांच्या त्यागाची तरुणपिढीला ओळख व्हावी यासाठी हा ट्रस्ट कार्यरत आहे. लंडनमधील ‘गोल्डन स्क्वेअर’ मध्ये नूर यांचे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी मदतनिधी जमविण्याचे कामही ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे. पत्रकारितेच्या आपल्या प्रदीर्घ काळात त्यांनी बेनझीर भुट्टो, शेख हसिना, सलमान रसदी, निराद सी चौधरी, व्हिव रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर, इस्माइल मर्चंट, मीरा नायर आणि शबाना आझमी अशा अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
GANDHARVI Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more