BETTY MAHMOODY

About Author

Birth Date : 09/06/1945


BETTY MAHMOODY IS AN AMERICAN AUTHOR AND PUBLIC SPEAKER BEST KNOWN FOR HER BOOK, NOT WITHOUT MY DAUGHTER, WHICH WAS SUBSEQUENTLY MADE INTO A FILM OF THE SAME NAME.

नॉट विदाऊट माय डॉटर ही बेस्टसेलर ठरलेली आणि पुलित्झर पुरस्कारासाठी नामांकन झालेली कादंबरी लिहिणारी बेट्टी महमूदी ही एक अमेरिकन लेखिका आहे. त्यांच्या या कादंबरीवर त्याच नावाने चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. वन वल्र्ड : फॉर चिल्ड्रन या संस्थेच्या त्या अध्यक्षा आणि सहसंस्थापिका आहेत. विविध संस्कृतींमधील परस्पर सामंजस्य वाढविण्यास ही संस्था मदत करते. आंतरसांस्कृतिक विवाहांतून जन्माला आलेल्या मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना आणि निर्भयता वाढविण्यासही ही संस्था मदत करते. इराणमधून पतीच्या कचाट्यातून आपल्या मुलीसह स्वत:ची सुटका करून घेऊन बेट्टी महमूदी अमेरिकेत परत आल्या. या जिवावर बेतलेल्या संकटातून सुटून आल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की, अशा संकटांना तोंड देणाNया त्या एकट्या नाहीत. मग ज्या पतींनी आपल्या पत्नीला मुलांपासून बळजबरीने दूर केले आहे, अशा ाQस्त्रयांच्या अनुभवांचे संकलन करून त्यांनी फॉर द लव्ह ऑफ अ चाइल्ड हे पुस्तक लिहिले. १९९० साली ऑकलंड विद्यापीठातर्पेÂ आउटस्टँडिंग वुमन ऑफ द इयर हा किताब देऊन त्यांना गौरविण्यात आले. तसेच जर्मनीकडून मोस्ट करेजियस वुमन ऑफ द इयर हा किताब मिळाला.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
NOT WITHOUT MY DAUGHTER Rating Star
Add To Cart INR 360
TBC Classic Book

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. पद्मा घरोटे, बंगळुरू.

पुस्तकाचे शीर्षक एकदम छान. `करतो गप्पा`, `मारतो गप्पा` सुद्धा चाललं असतं पण `छाटितो गप्पा` एकदम चपखल . साधी सोपी सरळ मराठी/वर्हाडी भाषा मनाला भावली आणि भूतकाळात घेऊन गेली. लेखकाच्या अनगळ बाईंना वाचून मला माझे नववीतले ईंग्रजी शिकवणारे बडवे मास्र आठवले जे आम्हाला डस्टरनी डोक्यावर मारायचे. `गव्हातले खडे` कथेतील मराठी चौथ्या वर्गातला श्रावण बाळ डोळे ओले करुन गेला. जोशी साहेबांची खाला १९८५ मधिल चन्द्रपूरची आठवण करवून गेली. जून्या पूस्तकात ठेवलेल्या मोरपिसा सारख्या आठवणी बाहेर आल्या आणि पुन्हा पुस्तकात गेल्या. प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक बरे वाईट लोक येतात, पण त्यांना असं पुस्तकात रेखाटणं प्रत्येकालाच जमत नाही ते आवघड काम लेखकानं केलं, म्हणून लेखकाचं खूप खूप अभिनंदन आणि असंच छान छान लिहित राहण्याकरीता शुभेच्छा. ...Read more

TEEN DAGADACHI CHUL
TEEN DAGADACHI CHUL by VIMAL MORE Rating Star
Dnyaneshwar Babruvahan Gund

अतिशय वास्तववादी, संवेदनशील आणि परिवर्तनाची आस धरून केलेले लेखन..... प्रेरणादायी आत्मकथन....