BHARATI PANDE

About Author

Birth Date : 28/03/1944


BHARATI PANDE IS A FREE-LANCE WRITER & TRANSLATOR & EDITOR. HER SHORT STORIES, NOVELS & POEMS BOOKS ARE PUBLISHED & 27 TRANSLATED BOOKS ALSO PUBLISHED. SHE IS WORKING ON AN INDEPENDENT PROJECT. SHE IS M.A. IN MARATHI LINGUISTICS. HER THREE TRANSLATED BOOKS ARE IN LINE TO BE PUBLISHED….

शिक्षण : एम.ए., बी.जे., जपानी भाषेची पदविका. समुपदेशन अभ्यास वर्ग. भारती पांडे यांचे ‘अक्षरित’, ‘बिनमहत्त्वाच्या माणसांच्या गोष्टी’, नवलकथा असे कथासंग्रह, तसेच ‘मनवा’ हा कवितासंग्रह व ‘जाग’ ही एकांकिका असे साहित्य प्रकाशित झाले आहे. त्याचप्रमाणे ‘काळी, ‘व्यथित मनानं सांगावंसं वाटतं की..... ‘एक एक पाऊल’, ‘द वल्र्ड ऑफ फतवा’, ‘मजल-दरमजल’, ‘ब्लास्पेÂमी’, ‘इंटरप्रिटर ऑफ मॅलडीज’, ‘कहै कबीर दिवाना’, ‘कोर्टशिप अँड मॅरेज’,‘मर्यादा’, ‘गव्हर्नन्स’, ‘द स्पाय प्रिन्सेस’, ‘द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स’, ‘प्रिन्स ऑफ अयोध्या’ अशी पुस्तके त्यांनी अनुवादित केली आहेत. त्यांच्या माहेर, विपुलश्री, मेनका, प्रपंच, मिळून साNयाजणी इ. नियतकालिकांत कविता, लेख व कथा प्रकाशित झाल्या आहेत. तसेच ‘सकाळ’, ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘लोकसत्ता’, ‘पुढारी’ यांसारख्या दैनिकांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या संशोधन विभागाच्या त्या माजी कार्याध्यक्ष आहेत. मंडळाच्या ‘स्त्री साहित्याचा मागोवा’ या त्रिखंडात्मक ग्रंथामध्ये शोधनिबंध व संपादनात साह्य केले आहे. ‘स्वाधार’ या स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी समुपदेशनाचे कार्य त्यांनी केले आहे. आसपासच्या गोष्टी (कथासंग्रह) मतलय (कवितासंग्रह) ‘अ गोल्डन एज’,(अनु.) अ हाऊस (अनु.) डिव्हायडेंड, द मदर (अनु.) असे त्यांचे साहित्य प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 17 total
AAHE KATTAR TARI Rating Star
Add To Cart INR 395
BHAKTIT BHIJALA KABIR Rating Star
Add To Cart INR 160
BLASPHEMY Rating Star
Add To Cart INR 260
EK EK PAUL Rating Star
Add To Cart INR 140
GOVERNANCE Rating Star
Add To Cart INR 320
HA SHODH VEGALA Rating Star
Add To Cart INR 190
KALI Rating Star
Add To Cart INR 280
MAJAL DARMAJAL Rating Star
Add To Cart INR 140
MAYADA - IRAQCHI KANYA Rating Star
Add To Cart INR 290
TBC Classic Book
MAZE MAJAPASHI KAAHI NAAHI Rating Star
Add To Cart INR 160
MHANE KABIR DIWANA Rating Star
Add To Cart INR 195
34 %
OFF
OSHO COMBO SET - 33 BOOKS Rating Star
Add To Cart INR 5880 INR 3869
12

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more