CHARLES HANDY

About Author


CHARLES HANDY, AUTHOR AND PHILOSOPHER, WAS BORN IN 1932 IN KILDARE, IRELAND. HE COMPLETED HIS ENTIRE EDUCATION FROM LONDON AND AMERICA. AFTER GRADUATING WITH A FIRST CLASS DEGREE FROM ORIEL COLLEGE, OXFORD, HE JOINED SHELL INTERNATIONAL IN MARKETING. SPECIALIZING IN ORGANIZATIONAL OPERATIONS AND MANAGEMENT, HANDY BEGAN STUDYING MANAGEMENT PSYCHOLOGY AT THE LONDON BUSINESS SCHOOL IN 1972.

लेखक आणि तत्वज्ञ असलेल्या चार्ल्स हॅन्डी यांचा जन्म १९३२ मध्ये किल्डरे, आयर्लंड येथे झाला. त्यांनी त्यांचे संपूर्ण शिक्षण लंडन आणि अमेरिकेतून पूर्ण केले. ओरियल कॉलेज, ऑक्सफर्ड येथून प्रथम श्रेणीत पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी ‘शेल इंटरनॅशनल’साठी विपणन क्षेत्रात काम सुरू केले. ‘संस्थेचे कार्ये आणि व्यवस्थापन’ या विषयात विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या हॅन्डी यांनी १९७२ मध्ये ‘लंडन बिझनेस स्कूल’मध्ये ‘व्यवस्थापन मानसशास्त्र’ शिकण्यास सुरुवात केली. १९७७ ते १९८१ दरम्यान त्यांनी विंडसर कॅस्टल येथील ‘स्टडी सेंटर’मध्ये ‘सामाजिक नैतिकता आणि मूल्ये’ यासंबंधी काम केले. १९८७ ते १९८९ या काळात त्यांनी लंडनच्या ‘रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स’चे अध्यक्षपद भूषवले. आत्तापर्यंत त्यांनी जवळ-जवळ सात ब्रिटीश विद्यापीठांकडून ‘डॉक्टरेट’ पदवी संपादन केली आहे. व्यवस्थानप क्षेत्रातील सर्वांत प्रभावशाली अशा ५०विचारवंतांमध्ये त्यांची गणना केली जाते. तर २००१ मध्ये ते या यादीत दुसऱ्या स्थानावर होते. सध्या ते नभोवाणी तसेच दूरचित्रवाणीवरचे नामांकित वक्ते म्हणून ओळखले जातात. जगभर त्यांच्या पुस्तकांच्या दहा लाखांहून अधिक प्रती खपल्या आहेत. सध्या हॅन्डी हे आपली पत्नी एलिझाबेथ व दोन मुलांसह इंग्लंड आणि इटली येथे वास्तव्य करत आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SWARTHATUN PARARTHAKADE Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more