CHHAYA MAHAJAN

About Author

Birth Date : 12/04/1949


DR. CHHAYA MAHAJAN IS AN MA (ENGLISH) AND HAS OBTAINED A DOCTORATE (PHD) IN ENGLISH. HE HAS WORKED AS A PROFESSOR AND LECTURER OF ENGLISH SUBJECT. AURANGABAD DR. EN. BH. PA. SHE WAS WORKING AS A PRINCIPAL IN A WOMENS COLLEGE. HE HAS ALSO WORKED AS A GUIDE FOR PH.D AND M.PHIL.

डॉ. छाया महाजन या एम.ए.(इंग्रजी), असून त्यांनी इंग्रजी विषयातच डॉक्टरेट (पीएच.डी.) मिळवली आहे. इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका व प्रपाठक म्हणून त्यांनी काम केले आहे. औरंगाबादमधील डॉ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात त्या प्राचार्या म्हणून कार्यरत होत्या. पीएच.डी व एम.फिलच्या मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. आजवर त्यांचे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे. यामध्ये स्पर्श , वळणावर , नकळत , मोरबांगडी , एकादश कथा , ओढ हे लघुकथासंग्रह तसेच निळ्या डोळ्यांचा माणूस , हरझॉग हे अनुवादित कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. कॉलेज , मानसी , तन अंधारे या कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. फुलांच्या गोष्टी , मुलांचे प्रेमचंद (३ खंड) या बालसाहित्याचे लिखाणही त्यांनी केले. मोगरा फुलला , भोवरा , रक्ताचा रंग एक या प्रकारच्या प्रौढशिक्षणावर आधारित साहित्य लिहिले. वुइमेन इन पॉल स्कॉटज नॉव्हेल्स यावर इंग्रजीतून संशोधनपर लिखाणही प्रसिद्ध झाले आहे. विविध वृत्तपत्रांतून इंग्रजी साहित्य, स्त्रीवादी साहित्य व विविध विषयांवर लेख व मुलाखाती प्रसिद्ध झाल्या आहेत. विविध साहित्यविषयक, सामाजिक व स्त्रीविषयक परिषदांमध्ये तसेच विविध साहित्य संमेलने व सामाजिक संमेलनांच्या परिसंवादातही त्यांनी सहभाग घेतला आहे. नकळत या लघुकथा संग्रहासाठी महाराष्ट्र शासन पुरस्कार (१९९२), कॉलेज या कादंबरीला महाराष्ट्र राज्य शासनाचा वि.स. खांडेकर पुरस्कार (२००७) तसेच स्वातंत्र्यसौनिक श्री. विनायकराव चारठाणकर पुरस्कार मिळाला आहे. महाजन यांना मराठवाडा गौरव पुरस्कार (सामाजिक व शैक्षणिक कार्याप्रीत्यर्थ), मराठवाडा भूषण पुरस्कार (साहित्य क्षेत्रातल्या कार्याप्रीत्यर्थ) ही प्राप्त झाले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 7 of 7 total
ADNYAT Rating Star
Add To Cart INR 180
COLLEGE Rating Star
Add To Cart INR 450
32 %
OFF
DR.CHHAYA MAHAJAN COMBO SET - 6 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1200 INR 814
EKADASH KATHA Rating Star
Add To Cart INR 150
MANSI Rating Star
Add To Cart INR 160
MULAKHAVEGALA Rating Star
Add To Cart INR 120
YASHODA Rating Star
Add To Cart INR 140

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more