CHRISTOPHER REICH

About Author

Birth Date : 12/11/1961


CHRISTOPHER REICH IS A SWISS AMERICAN AUTHOR. CHRISTOPHER REICH WAS BORN IN TOKYO ON NOVEMBER 12, 1961, SON TO WILLY WOLFGANG REICH AND MILDRED REICH. HIS FAMILY MOVED TO THE UNITED STATES IN 1965. HE GRADUATED UNDERGRAD FROM GEORGETOWN UNIVERSITY AND WENT ON TO STUDY BUSINESS AT THE UNIVERSITY OF TEXAS.

खिस्तोफर रिच यांचा जन्म टोकिओमध्ये झाला. वयाच्या चौथ्या वर्षी तो कुटुंबासमवेत लॉस एंजलिसला आला. १९७९साली त्याने हार्वर्ड स्वूÂलमधून पदवी संपादन केली. त्यानंतर वॉशिंग्टन डी.सी.ला जाऊन तिथल्या जॉर्जटाउन विद्यापीठातून त्याने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयातही पदवी मिळवली. दोन वर्षं त्याने स्टॉकब्रोकरचा व्यवसाय केला, पण त्यात त्याचे मन रमले नाही. स्वित्झर्लंडला जाऊन तो युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये नोकरी करू लागला. सात वर्षं बँकेत नोकरी केल्यावर त्याने अचानक लेखक व्हायचं ठरवलं. तोपर्यंत त्याने एखादी लघुकथादेखील लिहिली नव्हती विंÂवा इंग्रजी वाङ्मयाचा नीट अभ्यासही केला नव्हता. पण त्याला वाचनाचं जबरदस्त वेड होतं. आपण नक्की लेखक होऊ याचा ठाम विश्वास त्याला होता व त्याच्या पत्नीने त्याच्या या निर्णयाला मनापासून पाठिंबा दिला. त्यानंतर तो ऑस्टिनला स्थलांतरित झाला व तिथेच त्याने ‘नंबर्ड अकाउंट’ ही त्याची पहिली कादंबरी लिहिली. ‘नंबर्ड अकाउंट’ आणि ‘द पॅट्रियट्स क्लब’ या त्याच्या दोन गाजलेल्या कादंबNयांमुळे न्यू यॉर्वÂच्या सर्वाधिक खप असलेल्या लेखकांमध्ये त्याचं नाव झळकलं व २००६साली सर्वोत्कृष्ट खळबळजनक कादंबरीकाराचं पारितोषिक देऊन त्याला सन्मानित करण्यात आलं. पत्नी व मुलांसह तो सध्या दक्षिण वॅÂलिफोर्निया येथे राहत आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
RULES OF DECEPTION Rating Star
Add To Cart INR 480
TBC Classic Book

Latest Reviews

TANUJA Bankar

This book is so much informative. The imagination and the way of telling this kind of story is just amazing!!! It doesn`t getting bored to read this. Each page is interesting and About mysterious truth. It`s a pleasure to know about our culture and sme mysterious stories that we don`t know. I just want to Thank you so much dear AKSHAT GUPTA SIR for this wonderful book. #Must read book Lots of good wishes Akshat sir👏😊 ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा.डाॅ. राहुल हांडे .... संगमनेर

"जिसे भी देखिए वो अपने आप मे गुम है जूबा मिली है मगर हुंजुबा नही मिलता कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता..." संज्ञापन व दळणवळण याची अत्यंत वेगवान साधने सहज उपलब्ध असलेल्या आजच्या जगात वावरणाऱ्या माणसाची व्यथा उपरोक्त गझल सहजपणे व्यक्त करून जाते. मणसाच्या जीवनात भौतिक समृद्धीचा अतिरेक झालेला असताना माणसाचा माणसाशी संवाद मात्र क्षीण होत चाललेला दिसतोय. आजचा माणूस मोबाईलवर बोलायला कितीही वेळ देतोय;परंतु प्रत्यक्षात भेटून दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. भौतिक सुख सोयी व संज्ञापन-संपर्क साधनांचा सुळसुळाट आपल्या समाजात झालेला नव्हता तेव्हा एकमेकांशी बोलणं हा मनोरंजनच नव्हे तर एकूण जीवन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी प्रत्येक जणाला त्याच्या सोयीची कंपनी देखील उपलब्ध होती. त्यावेळी माणसाची आर्थिक व भौतिक परिस्थिती दुबळी असली तरी मनस्थिती बळकट होती. आज हे सर्व इतिहास जमा झालेले आहे. असे असताना जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे भारतीय समाजाच्या गप्पामय जीवनाची आठवण पुन्हा ताजी करणारे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशित केले आहे. घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांपासून सुरू झालेल्या या गप्पा कार्यालयीन कामकाजात देखील रंगलेल्या आहेत. सुमारे गेल्या पाच दशकांचा मराठी समाज त्याच्या समग्र वैशिष्ट्यांसोबत ह्या गप्पांमध्ये मनमुराद वावरताना दिसतो. पुस्तकाचे लेखक जी.बी. देशमुख यांचे बोट धरून वाचक जेव्हा ह्या गप्पांच्या आखाड्यात उतरतो तेव्हा हौदातील मातीत केव्हा रंगून जातो याचे भान राहत नाही. माणसाशी माणसाचा संवाद तुटला आहे. अशी तक्रार सतत कानावर पडत असताना `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकवार भोवतालच्या माणसांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच प्रेरित करते. माणसाशी माणसाचा तुटलेला संवाद जोडण्याच्या प्रयत्नांमध्ये जी.बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही. ...Read more