D.B.MOKASHI

About Author

Birth Date : 27/11/1915
Death Date : 29/06/1981


D.B. MOKASHI WAS BORN IN URAN IN RAIGAD DISTRICT. AFTER MATRICULATION, MOKASHI OBTAINED A DEGREE IN ENGINEERING AND STARTED A RADIO REPAIR BUSINESS IN PUNE. BUT HIS REAL INCLINATION WAS TOWARDS LITERATURE. ALONG WITH STORIES AND NOVELS, HE ALSO DEALT WITH DIFFERENT TYPES OF LITERATURE BASED ON DAILY LIFE EXPERIENCE LIKE FINE STORIES, MYSTERY STORIES, GHOST STORIES, MYSTERY STORIES.

दि.बा. मोकाशी यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण येथे झाला. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर मोकाशी यांनी अभियांत्रिकीची पदविका घेतली व पुण्यात रेडिओ दुरुस्तीचा व्यवसाय केला. पण त्यांचा खरा ओढा साहित्याकडे होता. कथा आणि कादंबरी या साहित्यप्रकारांसोबतच त्यांनी दैनंदिन जीवनानुभवावर आधारित ललित कथा, गूढकथा, पिशाच्चकथा, रहस्यकथा यासारखे वेगळ्या वळणाचे साहित्यप्रकारही हाताळले. संत तुकारामाच्या जीवनावरील ‘आनंद ओवरी’, ‘देव चालले’, ‘पुरुषास शंभर गुन्हे माफ’, ‘वात्स्यायन’, ‘स्थळ-यात्रा’ या त्यांच्या कादंबNया विशेष गाजल्या. १९४७ साली मोकाशींचा ‘लामणदिवा’ हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर ‘पाच हजार गायी’, ‘तू आणि मी’, ‘माऊली’, ‘चापलूस’, ‘कथामोहिनी’ अशा विपुल कथालेखनाने ते साठोत्तरी साहित्यातील नवकथाकार म्हणून ओळखले जाऊ लागले. ललित लेखन आणि बालसाहित्यातही मोकाशी यांचे भरीव योगदान आहे. ‘अठरा लक्ष पावले’, ‘अमृतानुभव’, ‘संध्याकाळचे पुणे’ असे अनेक ललित लेखसंग्रह त्यांच्या नावावर जमा आहेत. ‘अमेरिकन लायब्ररी’तर्फे राबविण्यात आलेल्या अनुवाद प्रकल्पातील महत्त्वाचे अनुवादही त्यांच्या नावावर आहेत. ‘घणघणतो घंटानाद’ आणि ‘प्लासीचा रणसंग्राम’ यांसारख्या पुस्तकांचा यात समावेश आहे. त्यांच्या ‘गुपित’, ‘पालखी’, ‘स्थळयात्रा’, ‘आमोद सुनासी आले’, ‘देव चालले’, ‘जमीन आपली आई’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाने ‘उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार’ देऊन गौरवले.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
GHANGHANTO GHANTANAD Rating Star
Add To Cart INR 550

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more