DALE CARNEGIE

About Author

Birth Date : 24/11/1900
Death Date : 01/11/1955


DALE CARNEGIE WAS AN AMERICAN WRITER AND LECTURER, AND THE DEVELOPER OF COURSES IN SELF-IMPROVEMENT, SALESMANSHIP, CORPORATE TRAINING, PUBLIC SPEAKING, AND INTERPERSONAL SKILLS

लोकप्रिय लेखक आणि प्रशिक्षक असलेल्या कार्नेगी यांचा जन्म मिसुरीतील एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. बालपण कष्टप्रद असूनही त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले, आणि नंतर त्यांनी आर्मर अ‍ॅन्ड कंपनी च्या विक्री विभागामध्ये यशस्वी कामगिरी बजावली. व्याख्याता होणे हे त्यांचे स्वप्न होते आणि म्हणून त्यांनी ती कंपनी सोडली होती. कार्नेगी खासकरून प्रसिद्ध आहेत, ते व्याख्याते व स्वसुधार समितीचे उद्गाते म्हणून. त्यांनी संवादकला व व्यक्तिमत्त्व सुधारणा या विषयांवर लिहिलेली पुस्तके विशेष गाजली असून सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांच्या वैयक्तिक कौशल्य व व्यक्तिमत्त्व सुधारणा प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ आजवर अनेक कॉर्पोरेट संस्थांनी व विविध क्षेत्रांतील अनेक लोकांनी घेतला आहे व त्याचा फायदा अनेकांना झालेला आहे. १९३२ साली त्यांनी लिंकन द अननोन हे पुस्तक लिहिले. त्यानंतर १९३६ साली त्यांनी लिहिलेले हाउ टू विन फ्रेड्स अ‍ॅन्ड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक प्रचंड गाजले आणि आजही ते तितकेच लोकप्रिय आहे. याशिवाय १९४८ साली लिहिलेले हाउ टू स्टॉप वरिंग अ‍ॅन्ड स्टार्ट लिव्हिंग हे पुस्तकही विशेष लोकप्रिय झाले. त्यांची इतरही पुस्तके लोकप्रिय व बेस्टसेलर आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 7 of 7 total
AAVASHYAK ASHI PACH LOKKOUSHALYE Rating Star
Add To Cart INR 200
CHINTA SODA SUKHANE JAGA Rating Star
Add To Cart INR 220
DALE CARNEGIE COMBO SET- 6 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1390
MAJET JAGA ANI ANANDANE KAM KARA Rating Star
Add To Cart INR 220
MITRA JODA ANI LONKANVAR PRABHAV PADA Rating Star
Add To Cart INR 250
PRABHAVSHALI SAMBHASHANACHA ZATPAT V... Rating Star
Add To Cart INR 280
SWATAHLA AVISMARANIYA BANVA Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more