DANNY DREYER ,KATHERINE DREYER

About Author


DANNY DREYER IS A RENOWNED COACH AND MENTOR IN THE SPORTS OF RUNNING AND WALKING. HE IS A FAMOUS ATHLETE IN ULTRA MARATHON EVENTS. IN A TOTAL OF 39 ULTRA MARATHON COMPETITIONS, HE HAS ACHIEVED THE HONOR OF COMING IN THE TOP THREE POSITIONS IN HIS DIVISION. HE IS AN INTERNATIONAL SPEAKER. HE PARTICIPATES IN MANY PROGRAMS ON CNN, NBC NEWS AND DISCOVERY CHANNEL. HIS INTERVIEWS HAVE BEEN PUBLISHED IN RUNNERS WORLD AND RINGING TIMES.

डॅनी ड्रेयर हे धावणे आणि चालणे या क्रीडाप्रकारांतील नावाजलेले प्रशिक्षक आणि मार्गदर्शक आहेत. ते ‘अल्ट्रा मॅरेथॉन’ स्पर्धांमधील गाजलेले खेळाडू आहेत. एकूण ३९ अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धांमध्ये आपल्या विभागात पहिल्या तीन क्रमांकांत येण्याचा मान त्यांनी पटकावला आहे. ते आंतरराष्ट्रीय वक्ते आहेत. ‘सीएनएन’, ‘एनबीसी न्यूज’ आणि ‘डिस्कव्हरी चॅनेल’वरील अनेक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. ‘रनर्स वर्ल्ड’ आणि ‘रिंनग टाइम्स’मधून त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. डॅनी आणि कॅथरिन ड्रेयर यांचे याआधी ‘ची वॉकिंग : फिटनेस वॉकिंग फॉर लाइफलाँग हेल्थ अँड एनर्जी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. दर महिन्याला ते स्वत:चे बातमीपत्रही प्रसिद्ध करतात. ‘आरोग्य, वैयक्तिक वाढ आणि निरोगी राहणे’ या विषयीच्या क्षेत्रात गेली २५ वर्षे कॅथरिन कार्यरत आहेत. ‘ची लिव्हींग इन्कॉर्पोरेशन’च्या त्या सहसंस्थापिका आहेत. सध्या ते दोघे अ‍ॅश्व्हिलेले, नॉर्थ कॅरोलिना येथे राहत आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CHI RUNNING Rating Star
Add To Cart INR 595

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more