DAPHNE DU MAURIER

About Author

Birth Date : 13/05/1907
Death Date : 19/04/1989


DAME DAPHNE DU MAURIER, LADY BROWNING, DBE WAS AN ENGLISH NOVELIST, BIOGRAPHER AND PLAYWRIGHT. HER PARENTS WERE ACTOR-MANAGER SIR GERALD DU MAURIER AND HIS WIFE, ACTRESS MURIEL BEAUMONT. HER GRANDFATHER WAS GEORGE DU MAURIER, A WRITER AND CARTOONIST.

डॅफने द्यू मोरियेर एक विख्यात इंग्लिश लेखिका आणि नाटककार आहेत. त्यांच्या अनेक साहित्यकृती चित्रपटासाठी स्वीकारल्या गेल्या, ज्यामध्ये रिबेका या १९४१ सालच्या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा समावेश होतो. डॅफने यांचा जन्म लंडन येथे झाला. जवळजवळ संपूर्ण आयुष्य त्यांनी कॉर्नवॉल या त्यांच्या आवडत्या ठिकाणी व्यतीत केले. अभिनेत्री म्यूरियेल ब्यूमॉण्ट आणि अभिनेता सर गेराल्ड द्यू मोरियेर हे त्यांचे आई-वडील. अभिनय क्षेत्रातील परिवारात जन्म घेतल्याने साहित्यक्षेत्रातील कारकीर्द सुरू करणे डॅफने यांना सोपे गेले. त्यांनी आपले सुरुवातीचे साहित्य बायस्टॅण्डर या नियतकालिकामधून प्रकाशित केले. १९३१ मध्ये त्यांची द लिव्हिंग स्पिरिट ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. समाजात फार न मिसळणार्या, एकान्तवासी अशी त्यांची प्रतिमा होती. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर रहाणे सोडले, तर एक उमदे आणि विनोदी व्यक्तिमत्त्व म्हणूनच लोक त्यांना ओळखत. कॉर्नवॉल येथील मेनाबिली या त्यांच्या घरी येणार्या लोकांचे त्या खूप मनापासून आदरातिथ्य करीत.१९९६ साली विमेन ऑफ अचिव्हमेंट या नावाने पाच ब्रिटिश टपाल तिकिटांचा संच छापण्याचे ठरले. त्या पाच स्त्रियांमध्ये डॅफने द्यू मोरियेर यांची निवड झाली. त्यांनी आपल्या बहुतेक पुस्तकांचे लेखन जिथे केले त्या कॉर्नवॉल येथील घरीच त्यांचा मृत्यू झाला.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
JAMAICA INN Rating Star
Add To Cart INR 250
MY COUSIN RACHEL Rating Star
Add To Cart INR 575

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more