DR. BHALBA VIBHUTE

About Author


PROFESSOR (DR.) BHALCHANDRA BABURAO ALIAS BHALBA VIBHUTE, M.A., PH.D. (POLITICAL SCIENCE), DIRECTOR & HEAD, DEPARTMENT OF ADULT, CONTINUING EDUCATION & EXTENSION WORK, SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR HAS A REWARDING CAREER AS A TEACHER FOR LAST 31 YEARS. HE HAS SUCCESSFULLY ADDRESSED THE NEEDS OF THE AMBIENT SOCIELY CONSISTENT WITH THE WORLD’S TRANSITION TO THE NEW MILLENNIUM BY IDENTIFYING LIFELONG LEARNING AS A KEY TO THE TWENTY – FIRST CENTURY

प्रा. डॉ. भालबा विभुते यांनी राज्यशास्त्र विषयात एम.ए. (१९७५) आणि पीएच.डी. (१९८१) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून प्राप्त केली. डॉ. विभुते हे शिवाजी विद्यापीठातील प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभागाचे माजी संचालक आहेत. संचालक पदाच्या काळात त्यांनी शिवाजी विद्यापीठ संचलित श्रमिक विद्यापीठाचे संचालक आणि मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक म्हणून ४ वर्षे कर्तव्य बजावले आहे. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या कोल्हापूर विभागीय केंद्राचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. १९७८ ते १९८४ या काळात कोल्हापूर येथील न्यू कॉलेजमध्ये राज्यशास्त्राचे अधिव्याख्याता म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. डॉ. विभुते यांनी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद, सिनेट, अ‍ॅकॅडमिक कौन्सिल इत्यादी अधिकार मंडळांवर काम केले आहे. तसेच युजीसी, राज्यशासन, देशातील विविध विद्यापीठे, राज्य साधन केंद्र, पुणे आकाशवाणी (महाराष्ट्र), कामगार कल्याण मंडळ (महाराष्ट्र) इत्यादी संस्था, मंडळांवर सदस्य म्हणून कार्य केले आहे. तसेच महाविद्यालयांच्या विविध व्यवस्थापनावरही काम केले आहे. डॉ. विभुते यांनी ३० ग्रंथांचे लेखन, संपादन केले आहे. त्यांच्या ‘महात्मा फुले विचारधन’ या पुस्तकात महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे तर ‘प्रौढ शिक्षण योजना, यंत्रणा आणि कार्यवाही’ या ग्रंथास शिवाजी विद्यापीठाने उत्कृष्ट ग्रंथ म्हणून पुरस्कृत केले आहे. डॉ. विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्याथ्र्यांनी पीएच.डी. संशोधन तर पाच विद्याथ्र्यांनी एम.फिल. पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ९ संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय परिसंवादामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. उत्तम वक्ते, लेखक, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक म्हणून त्यांना ओळखले जाते. विशेषत: संसदीय लोकशाही आणि आजीवन अध्ययन या क्षेत्रांत राष्ट्रीय पातळीवर त्यांना मान्यता प्राप्त झाली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more