DR. MANASI KELKAR

About Author


DR. MANASI KELKAR WORKED AS THE SENIOR PROJECT COORDINATOR FROM JANUARY 2018 TO 2024 ON THE PROJECT SURVEY OF DIALECTS OF MARATHI IN COLLABORATION WITH RAJYA MARATHI VIKAS SANSTHA, MUMBAI AND DECCAN COLLEGE, PUNE. SHE HOLDS A DOCTORATE IN LINGUISTICS FROM JAWAHARLAL NEHRU UNIVERSITY THESIS WAS ON THE SOCIOLINGUISTIC STUDY OF TRANSPLANTED LANGUAGES: THANJAVUR MARATHI. WHILE PURSUING HER GRADUATION IN SANSKRIT FROM RUIA COLLEGE, MUMBAI (UNIVERSITY GOLD MEDALIST) AND POST-GRADUATION IN LINGUISTICS FROM DECCAN COLLEGE, PUNE (FIRST RANK), SHE PASSED SIX EXAMINATIONS IN GERMAN LANGUAGE FROM MAX MUELLER BHAVAN, MUMBAI. AT THE SAME TIME, SHE HAS A GOOD KNOWLEDGE OF THE TAMIL LANGUAGE AND HAS BEEN WORKING ON TRANSLATIONS FROM ENGLISH AND TAMIL TO MARATHI FOR THE PAST FEW YEARS. HER AREAS OF INTEREST INCLUDE THE STUDY OF CONTACT LANGUAGES, THE FIELDWORK COLLECTION AND ANALYSIS OF LINGUISTIC MATERIAL, AND THE COMPARATIVE STUDY OF LANGUAGES. SHE HAS BEEN CONTINUOUSLY DELIVERING LECTURES FOR THE LAST TWO YEARS AS AN EXPERT GUIDE ON THE TOPICS OF DIALECT SURVEY METHOD AND SELECTION OF RESEARCH METHOD FOR MAHARASHTRA STATE FACULTY DEVELOPMENT AGENCY (MSFDA).

डॉ. मानसी केळकर या राज्य मराठी विकास संस्था,मुंबई आणि डेक्कन कॉलेज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणार्‍या मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण: प्रतिमांकन आणि आलेखन या प्रकल्पावर जानेवारी २०१८ पासून २०२४ पर्यंत वरिष्ठ प्रकल्प समन्वयक म्हणून कार्यरत होत्या. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून भाषाशास्त्र विषयात डॉक्टरेट पदवी संपादन केली असून त्यांचा संशोधनाचा विषय प्रत्यारोपित भाषांचा समाजभाषावैज्ञानिक अभ्यास: तंजावर मराठी हा होता. रुईया महाविद्यालय, मुंबई येथून संस्कृत या विषयात पदवी (विद्यापीठ सुवर्णपदकाच्या मानकरी) तसेच डेक्कन कॉलेज, पुणे येथून भाषाशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी (सुवर्णपदक) अशा तर्‍हेने शैक्षणिक वाटचाल करत असतानाच त्यांनी मॅक्स म्युलर भवन, मुंबई येथून जर्मन भाषेतील सहा परिक्षा उत्तीर्ण झाल्या. त्याचबरोबर विवाहामुळे संपर्कात आलेल्या तमिळ भाषेचेही उत्तम ज्ञान असून गेली काही वर्षे इंग्रजी तसेच तमिळ भाषेतून मराठी भाषेत भाषांतराचे काम करत आहेत. संपर्क भाषांचा अभ्यास, भाषिक सामग्रीचे क्षेत्रपाहणीद्वारे संकलन आणि त्याचे विश्लेषण, भाषांचा तौलनिक अभ्यास हे त्यांचे अभ्यासविषय आहेत. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था ( MSFDA) तर्फे गेली दोन वर्षे सातत्याने बोलीभाषा सर्वेक्षण पद्धती तसेच संशोधन पद्धतीची निवड या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून व्याख्यान देत आहेत. भाषा संशोधनासोबतच विविध भाषेतील साहित्याचा आस्वाद घेण्याची आवड तसेच निवेदन यांमध्ये विशेष रूची आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
NADIMUKH Rating Star
Add To Cart INR 360

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more