DR. SAJJAN SINGH YADAV

About Author


SAJJAN YADAV IS A RESEARCHER AND BUREAUCRAT. HE IS AN OFFICER OF THE INDIAN ADMINISTRATIVE SERVICE AND IS CURRENTLY ADDITIONAL SECRETARY IN THE DEPARTMENT OF EXPENDITURE, MINISTRY OF FINANCE, GOVERNMENT OF INDIA. HE HAS A RICH AND DIVERSE EXPERIENCE OF TWENTY-SEVEN YEARS IN POLICY FORMULATION AND IMPLEMENTATION, AS WELL AS IN SENIOR LEADERSHIP POSITIONS IN THE GOVERNMENT OF INDIA AND STATE GOVERNMENTS. IN THE FEDERAL GOVERNMENT, BESIDES THE MINISTRY OF FINANCE, HE HAS WORKED IN THE MINISTRY OF HEALTH AND FAMILY WELFARE, MINISTRY OF WOMEN AND CHILD DEVELOPMENT, MINISTRY OF HEAVY INDUSTRY AND PUBLIC ENTERPRISES AND MINISTRY OF CORPORATE AFFAIRS. HE HAS SERVED THE GOVERNMENT IN SECTORS INCLUDING FINANCE, HEALTH, NUTRITION, WATER, SANITATION, FOOD, PUBLIC DISTRIBUTION, URBAN DEVELOPMENT, MUNICIPAL ADMINISTRATION, INFORMATION AND PUBLICITY, ART, CULTURE, TOURISM AND COMMERCIAL TAXES. IMPORTANT ASSIGNMENTS HANDLED BY HIM IN THE PAST INCLUDE TENURES AS MISSION DIRECTOR OF THE NATIONAL NUTRITION MISSION (POSHAN ABHIYAN), DIRECTOR OF THE NATIONAL RURAL HEALTH MISSION, COMMISSIONER OF FOOD AND SUPPLIES IN DELHI, CEO, DELHI JAL BOARD, COMMISSIONER, VAT, AND COMMISSIONER OF THE EAST DELHI MUNICIPAL CORPORATION. HE EARNED HIS DOCTORATE IN PUBLIC HEALTH FROM THE PRESTIGIOUS LONDON SCHOOL OF HYGIENE AND TROPICAL MEDICINE (LSHTM). HIS RESEARCH WAS PUBLISHED IN LEADING MEDICAL PEER-REVIEWED JOURNALS, MAGAZINES AND NEWSPAPERS. THESE INCLUDE BMC PUBLIC HEALTH, INDIAN JOURNAL OF MEDICAL RESEARCH, INDIAN JOURNAL OF OCCUPATIONAL AND ENVIRONMENTAL MEDICINE, INTERNATIONAL JOURNAL OF MEDICINE AND PUBLIC HEALTH, JOURNAL OF CRITICAL REVIEWS, LSHTM RESEARCH ONLINE, GLOBAL HEALTH ACTION, YOJANA, ECONOMIC TIMES, DNA, MILLENNIUM POST AND PIONEER. HE HAS BEEN CONFERRED MANY AWARDS FOR EXCEPTIONAL WORK IN PUBLIC SERVICE, INCLUDING THE NATIONAL E-GOVERNANCE AWARD 2017-2018 AND THE PRESIDENT OF INDIAS MEDAL FOR OUTSTANDING WORK IN CENSUS OPERATIONS.

श्री. सज्जन सिंग यादव हे एक संशोधक आणि सरकारी अधिकारी आहेत. ते भारतीय प्रशासन सेवेत अधिकारी म्हणून कार्यरत असून, सध्या ते भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागातले अतिरिक्त सचिव आहेत. त्यांना धोरण निश्चिती आणि अंमलबजावणी क्षेत्रातील २७ वर्षांचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण अनुभव आहे. तसेच भारत सरकार आणि राज्य सरकारांमध्ये नेतृत्त्वाची वरिष्ठ पदे त्यांनी सांभाळलेली आहेत. सरकारच्या वित्त मंत्रालयाव्यतिरिक्त आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय, महिला व शिशुविकास मंत्रालय, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्रालय, आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, यामध्येही त्यांनी काम केलेले आहे. वित्त, आरोग्य, पोषण, जल, स्वच्छता, अन्न, सार्वजनिक वितरण, नागरी / शहर विकास, महापालिका प्रशासन, माहिती व प्रसारण, कला, सांस्कृतिक विभाग, पर्यटन, आणि व्यावसायिक कर, अशा अनेक विभागात त्यांनी सरकारची सेवा बजावली आहे. त्यांनी पूर्वी पार पाडलेल्या महत्त्वाच्या कामगिरीत पुढील कामांचा समावेश आहे – संचालक – राष्ट्रीय पोषण अभियान, संचालक- ग्रामीण आरोग्य अभियान, आयुक्त-अन्नधान्य आणि पुरवठा विभाग, दिल्ली, दिल्ली जल बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त - मूल्यवर्धित कर (VAT) विभाग, आणि आयुक्त, पूर्व दिल्ली महानगरपालिका. लंडन स्कूल ऑफ हायजिन अॅन्ड ट्रॉपिकल मेडिसिन या प्रतिष्ठित संस्थेकडून त्यांनी सार्वजनिक आरोग्य या विषयांत डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेली आहे. ज्या विज्ञान पत्रिकांमध्ये, त्याच क्षेत्रातल्या जाणकारांकडून गुणवत्तेची पडताळणी केल्यानंतरच संशोधन-लेख प्रसिद्ध केले जातात, अशा प्रमुख विज्ञान-पत्रिकांमध्ये, तसेच मासिके आणि वर्तमानपत्रांमध्ये, त्यांचा शोधनिबंध प्रकाशित केला गेला होता. यात पुढील जर्नल्सचा समावेश आहे, बी.एम.सी.- पब्लिक हेल्थ, इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च, इंडियन जर्नल ऑफ ऑक्युपेशनल अँड एन्व्हायरनमेंटल मेडिसिन, इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ, जर्नल ऑफ क्रिटिकल रिव्ह्यूज, LSHTML म्हणजे लंडन स्कूल ऑफ हायजिन अॅन्ड ट्रॉपिकल मेडिसिन यांचे रिसर्च ऑनलाईन, ग्लोबल हेल्थ अॅक्शन, योजना, दि इकॉनॉमिक टाइम्स, डीएनए, मिलेनियम पोस्ट, आणि दि पायोनियर. सार्वजनिक सेवा क्षेत्रात त्यांनी केलेल्या असामान्य कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. या पुरस्कारांमध्ये नॅशनल इ-गव्हर्नन्स अॅवॉर्ड २०१७ - २०१८ आणि प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया यांच्यातर्पेÂ ‘आऊटस्टँडिंग वर्क इन सेन्सस ऑपरेशन्स साठी दिल्या जाणार्या मेडल चा समावेश आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more