DR. SHUCHITA NANDAPURKAR-PHADKE

About Author

Birth Date : 18/09/1965


AS FAR AS DR. SHUCHITA NANDAPURKAR-PHADKE REMEMBERS, BOOKS HAVE BEEN HER BEST FRIENDS. AS SHE MOVED ALONG THE LIFE-PATH, IT WAS INEVITABLE TO TURN TOWARDS LITERATURE AS A PASSIONATE AFFAIR. THOUGH POETRY HAS BEEN A LEISURE ACTIVITY FOR HER FOR MANY YEARS, SHE SOON TURNED TOWARDS TRANSLATION. WITHIN A DECADE HER PASSION HAD BECOME HER PROFESSION. SHE ABLY HANDLES MANY GENRES RIGHT FROM SEX TO SPIRITUALITY. SHE HAS CONTRIBUTED IN EDUCATIONAL AND CHILD-LITERATURE AS WELL. BEING A COUNSELLOR ALLOWS HER TO UNDERSTAND THE ORIGINAL CONTENT IN A BETTER WAY. SO FOND WAS SHE OF HER PROFESSION THAT SHE WANTED TO EXCEL IN IT, HENCE, SHE ACQUIRED HER PHD IN MANAGEMENT OF TRANSLATION. NO WONDER, HER TRANSLATIONS, THOUGH HONEST TO THE SOURCE LITERATURE, ARE ALWAYS BEAUTIFUL AND AS GOOD AS ANY INDEPENDENT WRITING. SHE WISHES TO CONTRIBUTE IN THE WONDROUS AND JOYOUS WORLD OF TRANSLATION FOR YEARS TO COME.

शुचिता फडके यांचा जन्म १८ सप्टेंबर १९६५ झाला. त्यांनी विज्ञान आणि कला शाखेची पदवी प्राप्त केली असून, मानसशास्त्राच्या त्या द्विपदवीधर आहेत. शिवाय एम.बी.ए.(एच.आर) ही पदवीही त्यांनी प्राप्त केली आहे. ‘अनुवादशास्त्र : मांडणी आणि व्यवस्थापन’ या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. आत्मचरित्र, पौराणिक, तत्त्वज्ञान, विधी, तांत्रिक, शैक्षणिक, पाक-कृती, वैद्यकीय अशा विविध विषयांवरील अनेक पुस्तकांचा मराठी व इंग्रजी अनुवाद त्यांनी केला आहे. कॅन्सर रुग्णांसाठी समुपदेशन, शैक्षणिक क्षेत्र (अभ्यागत प्राध्यापक), मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, शालेय अभ्यासक्रम रचना, व्हॉईस ओव्हर, प्री स्कूल उभारणी या क्षेत्रांमध्ये त्यांचं योगदान आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 17 total
AMAR HRUDAY Rating Star
Add To Cart INR 350
ARDHANAARI Rating Star
Add To Cart INR 270
EKA LALASENE Rating Star
Add To Cart INR 320
EKAKI SUGI Rating Star
Add To Cart INR 270
EMOTIONAL INTELLIGENCE Rating Star
Add To Cart INR 320
FIFTY SHADES DARKER Rating Star
Add To Cart INR 700
FIFTY SHADES FREED Rating Star
Add To Cart INR 700
FISH! Rating Star
Add To Cart INR 200
FISH! FOR LIFE Rating Star
Add To Cart INR 190
FISH! STICKS Rating Star
Add To Cart INR 140
FISH! TALES Rating Star
Add To Cart INR 200
IN BETWEEN Rating Star
Add To Cart INR 395
12

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more