DR. TEJASVI KATTIMANI

About Author


PROF. TEJASVI VENKAPPA KATTIMANI IS A RENOWNED PERSONALITY IN THE FIELD OF LITERATURE AND HIGHER EDUCATION. HE HAS ESTABLISHED HIMSELF AS A WELL-KNOWN FIGURE IN LITERATURE, WELL VERSED IN CREATIVE WRITING WITH A SOCIAL COMMITMENT HAS PRODUCED MANY LITERARY WORKS OF HIGH QUALITY IN DIFFERENT FORMS OF LITERATURE. HIS CONTRIBUTIONS ARE VERY HIGH AS A CRITIC AND TRANSLATOR. LITERATURE FOR HIM IS THE MOST POWERFUL MEDIUM TO UNITE PEOPLE AND ELABORATE THE REAL SOCIAL SCENARIO WHICH MAKES PEOPLE TO THINK, STRUGGLE AND BE CULTURALLY AWARE. AS A TRANSLATOR T.V. KATTIMANI HAS TRANSLATED MANY LITERARY AND NON-LITERARY TEXTS FROM KANNADA TO HINDI, HINDI TO KANNADA, GUJARATI TO KANNADA AND ENGLISH TO HINDI. WHILE TRANSLATING HE ALSO IS INCLINED IN THE STUDY OF COMPARATIVE LITERATURE WITH A VIEW TO SHOW THE INDIAN NESS AND COMPOSITE CULTURE SPREAD BY THE WRITINGS OF DIFFERENT INDIAN LANGUAGES.

डॉ. टी़. वी. कट्टिमनी यांनी हिंदी या विषयात एम.ए., पीएच.डी. या पदव्या संपादन केल्या आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजातीय विद्यापीठाचे ते माजी कुलगुरू आहेत. प्रोफेसर, विभागप्रमुख आणि डीन या पदांवर कर्नाटक विद्यापीठ आणि मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठात त्यांनी काम केले. देश-विदेशातील अनेक स्थळांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. राज्य आणि केंद्रीय पातळीवरील अनेक संस्था आणि विद्यापीठाच्या समित्यांवर त्यांनी सदस्य आणि अध्यक्षपद भूषविले. ‘नवीन शिक्षण धोरण २०२०’चेही ते माजी सदस्य आहेत. आंध्र प्रदेश केंद्रीय जनजातीय विद्यापीठाचे ते विद्यमान कुलगुरू आहेत. हिंदी आणि कन्नडमध्ये त्यांची १८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध नियतकालिकांमध्ये लेख व शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. वीसपेक्षा अधिक पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला आहे. सौहार्द सन्मान (२०१८), वाग्धारा नवरत्न सन्मान (२०१८), अल्वाज नूदिसिरी सन्मान (२०१७), कर्नाटक राज्योत्सव सन्मान (२०१६), शिक्षा विभूषण सन्मान (२०१६), जी. पी. राजरत्नम् साहित्य संवर्धन सन्मान (२०१६) इत्यादी सन्मानांनी ते विभूषित आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
JUNGLEE KULGURUCHI JANGI KATHA Rating Star
Add To Cart INR 260

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more