DR.ARUNA KAULGUD

About Author

Birth Date : 28/01/1948


MA IN ECONOMICS AND DOCTORATE IN CORPORATE PLANNING AND ADMINISTRATION. ARUNA KAULGOOD IS KNOWN AS A MANAGEMENT CONSULTANT, RESEARCHER, SPEAKER, AUTHOR, PROFESSOR AND TRAINER. HE HAS RECEIVED SPECIAL TRAINING AS A TRAINER-MOTIVATOR FROM DELHIS RENOWNED INSTITUTE NISBAD TO IMPART ENTREPRENEURSHIP TRAINING.

अर्थशास्त्रात एम.ए. आणि कॉर्पोरेट प्लॅनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या विषयात डॉक्टरेट असलेल्या डॉ. अरुणा कौलगुड या व्यवस्थापन सल्लागार, संशोधक, वक्त्या, लेखिका, प्राध्यापक आणि प्रशिक्षक म्हणून ओळखल्या जातात. उद्योजकता प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी दिल्लीच्या प्रख्यात निस्बड या संस्थेचे ट्रेनर-मोटिव्हेटर म्हणून विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. मुंबई व एस.एन.डी.टी. विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केले आहे. ऐच्छिक निवृत्तीनंतर त्या व्यवस्थापन सल्लागार व मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. विविध संघटनांचे व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास, वर्तन निरीक्षणशास्त्र आणि जीवन कौशल्ये या संबंधित विषयांवर प्रशिक्षण देतात. वल्र्ड बँकेतर्फे श्रीलंकेत त्यांनी इंटरनॅशनल रिव्ह्यूअर म्हणून काम केले. जागतिक श्रम परिषद (वर्ल्ड लेबर ऑर्गनायझेशन) आणि एम्प्लॉयर्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी व्याख्यात्या-प्रशिक्षक म्हणून काम केले. महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, यांच्या संचालक मंडळांवर संचालक म्हणून त्यांनी काम केले. मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानच्या सेंटर फॉर इन्स्टीट्युशन बिल्डिंग अ‍ॅण्ड लीडरशीप स्टडीज या केंद्राच्या मानद संचालक होत्या. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सबरोबर त्या संबंधित होत्या. त्यांनी अनेक पुस्तके, शोधनिबंध, लेख असे विपुल लेखन केलेले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
INTERVIEW TECHNIQUES AND PRESENTATIO... Rating Star
Add To Cart INR 95
JAGAPRASIDDHA WHA Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more