DR.SHANTANU ABHYANKAR

About Author


"GRADUATION FROM PUNES B. J. MEDICAL COLLEGE (MBBS) AND POST GRADUATE EDUCATION IN GYNECOLOGY AND OBSTETRICS (M.D. OB. GYN). WORKED IN VARIOUS POSITIONS IN IMA AS WELL AS OTHER ORGANIZATIONS, FIRST SECRETARY OF GYNECOLOGY COMMITTEE IN NATIONAL ASSOCIATION OF GYNECOLOGISTS, AUTHORED SEVERAL POSTGRADUATE BOOKS, GIVES LECTURES IN PURE MARATHI ON CLASSICAL TOPICS IN STATE LEVEL CONFERENCES. GIVING MEDICAL SERVICES IN RURAL AREAS FOR THE PAST 25 YEARS. USE OF MODERN FACILITIES AND TECHNIQUES DESPITE BEING A SMALL VILLAGE. THE ORIGINATOR OF MANY TRICKS AND VARIOUS SURGERIES TO OVERCOME THE DIFFICULTIES IN RURAL AREAS. TAKING NOTE OF ALL THIS, ON BEHALF OF THE GOVERNMENT OF MAHARASHTRA, DR. ANANDIBAI JOSHI GAURAV AWARD (2007) IS GIVEN. ACTIVE PARTICIPATION IN ‘LOKVDNYAN SANGHATANA’, ANDHASHRADHHA NIRMULAN SAMITI. RENOWNED AS A FINE WRITER, POIGNANT SCIENCE WRITER, SKILLFULL TRANSLATOR, CRISP BLOGGER, ERUDITE SPEAKER. HIS WRITINGS ON WOMENS HEALTH ARE PARTICULARLY POPULAR. HE RUNS A SPECIAL MARATHI CHANNEL ON WOMENS HEALTH ON YOUTUBE. APART FROM THIS, THE FOLLOWING BOOKS ARE PUBLISHED ON VARIOUS SUBJECTS, BAYAKAT PURUSH LAMBODA, DEVAGHARACHI PHULE, PALI MILI GUPCHILI, AROGYAVATI BHAV, FATHER TERESA, SAMBHOG KA SUKHACHA?, JADUI VASTAV, RATRA SOLA JANEVARICHI, MALA SHASTRADNYA VHAYACHE AHE, SHASTRADNYA AJICHYA GOSHTI.

"पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेज मधून पदवी (MBBS) व पुढे स्त्रीआरोग्य आणि प्रसूतीशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण (M.D. OB. GYN). आयएमए तसेच इतर संघटनांत विविध पदांवर काम, स्त्रीआरोग्यतज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेत कामविज्ञान समितीचे पहिले सचिव, अनेक पदव्युत्तर पुस्तकांत लिखाण समाविष्ट, राज्यस्तरीय परिषदेत शास्त्रीय विषयावर शुद्ध आणि फर्ड्या मराठीत व्याख्याने. गेली २५ वर्षे ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा. लहान गावात असूनही अत्याधुनिक सुविधा आणि तंत्रांचा वापर. ग्रामीण भागातल्या अडचणींवर मात करण्यासाठी अनेक युक्त्याप्रयुक्त्यांचे आणि निरनिराळ्या शल्यक्रियांचे जनक. या साऱ्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनातर्फे डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार (२००७) प्रधान. लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धानिर्मूलन समिती वगैरे संघटनांत सक्रिय सहभाग, नास्तिक विचार आणि उत्क्रांती हे खास अभ्यासाचे विषय. ललित लेखक, मार्मिक विज्ञान लेखक, रसाळ भाषांतरकार, खुसखुशीत ब्लॉगर, अभ्यासू वक्ता म्हणून ख्यातकीर्त. स्त्रीआरोग्य विषयक लिखाण विशेष जनप्रिय. यूट्यूबवर स्त्री आरोग्यावर खास मराठी चॅनेल. त्याला कोटींवर हिट्स. याशिवाय विविध विषयांवरील खालील पुस्तके प्रकाशित- I बायकांत पुरुष लांबोडा, देवाघरची फुले, पाळी मिळी गुपचिळी, आरोग्यवती भव, फादर टेरेसा, संभोग का सुखाचा?, जादुई वास्तव, रात्र सोळा जानेवारीची, मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे. शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी. "
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
RADHIKASANTVANAM Rating Star
Add To Cart INR 330

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more