DR.SUCHIT TAMBOLI

About Author

Birth Date : 24/02/1965


PAEDIATRICS, CHILD DEVELOPMENT AND ADOLESCENCE (M.B.B.S., D.C.H., P.G.D.A.P., P.G.D.M.L.S.) IN JANUARY, 1992, MAHARASHTRAS FIRST PRIVATE CHILD DEVELOPMENT CENTER WAS ESTABLISHED AT AHMEDNAGAR. EARLY INTERVENTION TREATMENT METHODS, CHILD BEHAVIOR PROBLEMS, CHILDREN FALLING BEHIND IN SCHOOL, MENTAL RETARDATION, FAMILY HEALTH-COACHING FOR ADOLESCENT CHILDREN ETC. SPEECHES ALL OVER INDIA ON THE SUBJECTS.

बालरोग, बालविकास व पौगंडावस्थातज्ज्ञ (M.B.B.S., D.C.H., P.G.D.A.P., P.G.D.M.L.S.) जानेवारी, १९९२ मध्ये अहमदनगर येथे महाराष्ट्रातील पहिल्या खासगी बालविकास केंद्राची स्थापना. लवकर हस्तक्षेप उपचार पद्धती , मुलांच्या वर्तनसमस्या, शाळेत मागे पडणारी मुले, मतिमंदत्व, पौगंडावस्थेतील मुलांसाठी कौटुंबिक आरोग्य-प्रशिक्षण इ. विषयांवर संपूर्ण भारतभर भाषणे. राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटने च्या शालेय शिक्षण समितीचे सदस्य. आकाशवाणीवर ५० कार्यक्रम प्रक्षेपित. लोकमत , सकाळ , लोकसत्ता , महाराष्ट्र टाइम्स इ. वृत्तपत्रांमध्ये लेख प्रसिद्ध. जन्मलेल्या बाळांसाठी मातेने करायचा सोपा बौद्धिक कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटने नेसुद्धा (WHO) मान्य केला आहे. राष्ट्रीय स्थूलता निवारण समिती २०१२-१४ चे सदस्य, लवकर हस्तक्षेप उपचार केंद्र केंद्रशासन संचालित कार्यक्रमात सल्लागार समितीवर (२०१३). २०१४-१५ साठी राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या वाढ, विकास, वर्तनसमस्या या उपविभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष. २०१५ महाराष्ट्र शासनाच्या अपंगत्व प्रमाणीकरण समितीचे अध्यक्ष. समितीच्या रिपोर्टवर कायदा होणार. विविध विषयांवर भाषणे – फेब्रुवारी, २००१ पाटणा – मुलांच्या वर्तनसमस्या. नोव्हेंबर, २००२ दिल्ली – आंतरराष्ट्रीय परिषद, शाळेतील व वातावरणातील घटकांचा पौगंडावस्थेतील मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम. जानेवारी, २००३ मुंबई – मुलांचा विकास व प्रश्न. जानेवारी, २००४ चेन्नई – मुलांच्या बौद्धिक विकासाचे प्रश्न कसे ओळखायचे, तसेच मुलांशी सुसंवाद : वाचा विकास यावर मार्गदर्शन. सप्टेंबर, २००४ गुवाहाटी – सेरेब्रल पाल्सी आणि मतिमंदत्व निदान-उपचार. ऑक्टोबर, २००५ लखनौ – विकासात्मक चाचण्या. जानेवारी, २००६ दिल्ली – आहार व अपंगत्व. सप्टेंबर, २००६ दिल्ली – वाढीच्या तक्त्यांचा प्रक्टिसमध्ये वापर. सप्टेंबर, २००७ कटक – स्वनियंत्रित उपचाराद्वारे पौगंडावस्थेतील मुलांच्या वर्तनसमस्यांचे निराकारण. जानेवारी, २००८ मुंबई – प्रसारमाध्यमांचा मुलांच्या वर्तनावर होणारा परिणाम. डिसेंबर, २००८ महाबळेश्वर – पौगंडावस्थेतील मुलांच्या वर्तनसमस्या व उपचार. जानेवारी, २०१० हैदराबाद – दोन वर्षांच्या खालील मुलांसाठी खेळ-शाळा कशी असावी. ऑक्टोबर, २०१० – सवयींचे आजार तर लुधियाना येथे वर्तनसमस्या ओळख व उपचार. जयपूर-२०११, मुंबई-२०१२, शिर्डी-२०१२ येथील राष्ट्रीय परिषदांमध्ये वर्तनसमस्यांचे उपचार, लवकर हस्तक्षेप उपचार. २०१० मध्ये अध्ययन अक्षमता यावर कोल्हापूर येथे राज्यस्तरीय परिषदेत, तर नागपूरला २०१२, अस्थिर मुले व शाळेतील कार्यक्षमता तसेच वर्तनात्मक उपचार व औषधांचे उपचार यांतील फरक.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MULANCHYA SAMRUDDHA JIVANASATHI Rating Star
Add To Cart INR 260

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more