E.R. BRAITHWAITE

About Author

Birth Date : 27/06/1920


ER IS A NOVELIST, WRITER AND TEACHER BORN IN GEORGETOWN, GUYANA. BRAITHWAITE IS PARTICULARLY WELL KNOWN FOR HIS STORIES ABOUT RACIAL DISCRIMINATION AND SOCIAL STATUS ABOUT BLACKS. DESPITE THEIR EDUCATIONAL QUALITY AND ABILITY, ER LIKE OTHER ETHNIC MINORITIES AFTER WORLD WAR II. BRAITHWAITE ALSO COULD NOT FIND WORK IN HIS FIELD. HE HAD TO TAKE UP A JOB AS A SCHOOL TEACHER IN LONDON. TO SIR WITH LOVE IS A BOOK OF EXPERIENCES FROM THE TEACHING PROFESSION.

जॉर्जटाऊन, गयाना येथे जन्मलेले कादंबरीकार, लेखक आणि शिक्षक असलेले इ.आर. ब्रेथवेट कृष्णवर्णीयांबद्दलचे वांशिकभेद आणि सामाजिक स्थिती यांवरील कथांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. शैक्षणिक गुणवत्ता आणि क्षमता असतानाही दुसऱ्या महायुद्धानंतर अन्य वांशिक अल्पसंख्यांकांप्रमाणे इ.आर. ब्रेथवेट यांनाही त्यांच्या क्षेत्रातले काम मिळू शकले नाही. त्यांना लंडनमध्ये शालेय शिक्षकाची नोकरी पत्करावी लागली. टु सर विथ लव्ह हे पुस्तक या शिक्षकी पेशातून आलेले अनुभवांचे बोल आहेत. पुस्तके लिहिताना ते सामाजिक कार्याकडे वळाले. कृष्णवर्णीय मुलांचा सांभाळ करण्यासाठी ते काम करू लागले. त्यातूनच पेड सव्र्हंट या कादंबरीचा उदय झाला. टु सर विथ लव्ह या पुस्तकावर १९६७ मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला. शैक्षणिक सल्लागार म्हणून त्यांचे काम चालू आहेच. आत्तापर्यंत त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
TO SIR, WITH LOVE Rating Star
Add To Cart INR 320
TBC Classic Book

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more