ELLIOTT KATZ

About Author


ELIOT KATZ DRAWS ON THE WISDOM AND KNOWLEDGE OF THE PAST AS HE SEEKS TO UNDERSTAND THE CHALLENGES HE FACES IN LIFES JOURNEY. HIGHLY EFFECTIVE; BUT HE DISCOVERED A POINT OF VIEW THAT WAS OFTEN FORGOTTEN. IT ANSWERED MANY OF THEIR QUESTIONS. HE ALSO OBSERVED THAT MANY OTHERS WERE FACING SIMILAR CHALLENGES. PEOPLE STARTED COMING TO HIM FOR ADVICE. MANY PEOPLE SAID TO HIM, WHY DID NOT ANYONE TELL ME THIS BEFORE? ELLIOTT KATZ IS A PROFESSIONAL SPEECHWRITER. HE HAS WRITTEN SEVEN NON-FICTION BOOKS. THE BESTSELLING BOOK GREAT COUNTRY WALKS AROUND TORONTO IS ALSO HIS. HE HAS WRITTEN ON VARIOUS TOPICS FROM ECONOMY TO HOW TO IMPLEMENT NEW IDEAS IN THE WORKPLACE. THEY TEACH THE PRINCIPLES IN THIS BOOK. ALSO PARTICIPATES IN SEMINARS AND CONFERENCES.

"जीवनप्रवासात समोर आलेली आव्हाने समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना, इलियट काट्झ यांनी पूर्वापार चालत आलेला सुज्ञपणा आणि ज्ञान यांचा वेध घेतला. अत्यंत प्रभावी असलेले; पण अनेकदा विस्मरणात गेलेले दृष्टिकोन त्यांनी शोधून काढले. त्यातूनच त्यांना त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. अन्य अनेकजणांना त्यांच्यासारख्याच आव्हानांना तोंड द्यावे लागत असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. लोक त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागले. ‘मला यापूर्वी कुणीच हे का नाही सांगितले?’ असे त्यांना खूपजणांनी म्हटले. इलियट काट्झ व्यावसायिक स्पीचराइटर आहेत. त्यांनी सात नॉन-फिक्शन पुस्तके लिहिली आहेत. ‘ग्रेट कंट्री वॉक्स अराउंड टोरोंटो’ हे बेस्टसेलर पुस्तकही त्यांचेच आहे. अर्थव्यवस्थेपासून कामाच्या ठिकाणी नव्या कल्पना कशा साकाराव्यात इथपर्यंत वैविध्यपूर्ण विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. या पुस्तकातल्या तत्त्वांचे ते धडे देतात. सेमिनार आणि परिषदांमध्येही सहभागी होतात."
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ASA ASAVA JODIDAR Rating Star
Add To Cart INR 140

Latest Reviews

TANUJA Bankar

This book is so much informative. The imagination and the way of telling this kind of story is just amazing!!! It doesn`t getting bored to read this. Each page is interesting and About mysterious truth. It`s a pleasure to know about our culture and sme mysterious stories that we don`t know. I just want to Thank you so much dear AKSHAT GUPTA SIR for this wonderful book. #Must read book Lots of good wishes Akshat sir👏😊 ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा.डाॅ. राहुल हांडे .... संगमनेर

"जिसे भी देखिए वो अपने आप मे गुम है जूबा मिली है मगर हुंजुबा नही मिलता कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता..." संज्ञापन व दळणवळण याची अत्यंत वेगवान साधने सहज उपलब्ध असलेल्या आजच्या जगात वावरणाऱ्या माणसाची व्यथा उपरोक्त गझल सहजपणे व्यक्त करून जाते. मणसाच्या जीवनात भौतिक समृद्धीचा अतिरेक झालेला असताना माणसाचा माणसाशी संवाद मात्र क्षीण होत चाललेला दिसतोय. आजचा माणूस मोबाईलवर बोलायला कितीही वेळ देतोय;परंतु प्रत्यक्षात भेटून दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. भौतिक सुख सोयी व संज्ञापन-संपर्क साधनांचा सुळसुळाट आपल्या समाजात झालेला नव्हता तेव्हा एकमेकांशी बोलणं हा मनोरंजनच नव्हे तर एकूण जीवन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी प्रत्येक जणाला त्याच्या सोयीची कंपनी देखील उपलब्ध होती. त्यावेळी माणसाची आर्थिक व भौतिक परिस्थिती दुबळी असली तरी मनस्थिती बळकट होती. आज हे सर्व इतिहास जमा झालेले आहे. असे असताना जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे भारतीय समाजाच्या गप्पामय जीवनाची आठवण पुन्हा ताजी करणारे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशित केले आहे. घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांपासून सुरू झालेल्या या गप्पा कार्यालयीन कामकाजात देखील रंगलेल्या आहेत. सुमारे गेल्या पाच दशकांचा मराठी समाज त्याच्या समग्र वैशिष्ट्यांसोबत ह्या गप्पांमध्ये मनमुराद वावरताना दिसतो. पुस्तकाचे लेखक जी.बी. देशमुख यांचे बोट धरून वाचक जेव्हा ह्या गप्पांच्या आखाड्यात उतरतो तेव्हा हौदातील मातीत केव्हा रंगून जातो याचे भान राहत नाही. माणसाशी माणसाचा संवाद तुटला आहे. अशी तक्रार सतत कानावर पडत असताना `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकवार भोवतालच्या माणसांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच प्रेरित करते. माणसाशी माणसाचा तुटलेला संवाद जोडण्याच्या प्रयत्नांमध्ये जी.बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही. ...Read more