FRANK BUNKER GILBRETH

About Author

Birth Date : 17/03/1911
Death Date : 18/02/2001


FUNK BUNKER GILBRETH WAS BORN ON MAY 17, 1911 IN NEW JERSEY. HE WAS PREDECEASED BY HIS FATHER FUNK GILBREATH SR., MOTHER LILLIAN MOELLER GILBREATH, AND ELEVEN SIBLINGS RIGHT THEY WERE LIVING IN THEIR HOUSE IN MONTCLAIR. HIS BOOK CHEAPER BY THE DOZEN IS MOSTLY AUTOBIOGRAPHICAL.

फँक बंकर गिलब्रेथ यांचा जन्म १७ मे, १९११ रोजी न्यू जर्सी येथे झाला. त्यांचे वडील फँक गिलब्रेथ सीनिअर, आई लिलियन मॉलर गिलब्रेथ आणि अकरा भावंडे यांच्या बरोबर ते आपल्या माँटक्लेअर येथील घरात रहात होते. चीपर बाय द डझन हे त्यांचे पुस्तक म्हणजे बहुतांशी आत्मचरित्रपर आहे. या पुस्तकावर आधारीत चित्रपटही फार लोकप्रिय ठरला. आयुष्याच्या उत्तरार्धात ते साऊथ कॅरोलिनातील चार्ल्सटन येथे स्थाईक झाले. तेथे पत्रकार, लेखक आणि एका वृत्तपत्राचे कार्यकारी अधिकारी म्हणून ते काम करू लागले. अ‍ॅश्ले कूपर या टोपणनावाने त्यांनी चार्ल्सटन पोस्ट कुरिअर या वृत्तपत्रासाठी १९१३ पर्र्यंत स्तंभलेखन केले. जवळजवळ पन्नास वर्षे जिथे वास्तव्य झालेल्या साऊथ कॅरोलिना येथील त्यांच्या घरातच २००१ साली त्यांचे निधन झाले.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CHEAPER BY THE DOZEN Rating Star
Add To Cart INR 150

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more