GAURI GADEKAR

About Author

Birth Date : 28/08/1952


GAURI SUBHASH GADEKAR IS BSC.,LLB(GENERAL). SHE HAS ALSO DONE DIPLOMA IN TRANSLATION.SHE WAS WORKING IN BANK OF INDIA AS OFFICER AND THEN RETIRED UNDER V.R.S. THREE SHORT STORY COLLECTIONS VIZ.NAATA(TWO EDITIONS),AUTSAIDAR,SAHAJ VAGAIRE & TISARA PUSTAK,WRITTEN BY HER ARE PUBLISHED.TWO OF HER TRANSLATED BOOKS VIZ.VADALATIL DIPSTAMBH(ORIGINAL ENGLISH BOOK: WINNING IN TROUBLED TIMES BY DR.KREFLO DOLLAR) & MRUTYUVAR MAAT (ORIGINAL ENGLISH BOOK :CHEATING DEATH BY DR.SANJAY GUPTA) ARE PUBLISHED BY MEHTA PUBLISHING HOUSE. MANY OF HER SHORT STORIES & POEMS ARE PUBLISHED IN VARIOUS MAGAZINES/DIWALI ISSUES OF THE MAGAZINES. SHE HAS SECURED MANY AWARDS IN THE WRITING COMPETITIONS.THE FEATHER IN HER CAP IS THE BEST FEMALE WRITER AWARD BY DIWA PRATISHTHAN IN 2012-13.

गौरी सुभाष गाडेकर बीएससी,एलएलबी (जनरल) असून त्यानंतर त्यांनी डिप्लोमा इन ट्रान्सलेशन केला. त्या बॅंक ऑफ इंडिया मध्ये ऑफिसर होत्या. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांचे नातं,आउटसाइडर,सहज वगैरे व तिसरं पुस्तक हे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत .तसेच मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे वादळातील दीपस्तंभ( मूळ इंग्रजी पुस्तक:डॉ.क्रेफ्लो डॉलरलिखित विनिंग इन ट्रबल्ड टाइम्स) व मृत्यूवर मात(मूळ इंग्रजी पुस्तक: डॉ.संजय गुप्तालिखित चीटिंग डेथ) ही दोन अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या अनेक कथा,कविता मासिके/दिवाळी अंकांत प्रसिद्ध झाल्या आहेत. अनेक कथास्पर्धा व काव्यस्पर्धांत त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. दिवा प्रतिष्ठान तर्फे 2012-13मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट लेखिका हा पुरस्कार देण्यात आला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
LINCOLN ON LEADERSHIP Rating Star
Add To Cart INR 220
MRUTYUVAR MAAT Rating Star
Add To Cart INR 240
VADALATIL DEEPSTAMBH Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more