HIMSAGAR JAYWANT THAKUR

About Author

Birth Date : 01/12/1985


I HAVE COMPLETED B.E. IN PRODUCTION ENGINEERING & PGDM IN OPERATIONS. I WROTE MY FIRST BOOK NAMELY HELP YOURSELF, WHICH IS PUBLISH BY POWER PUBLICATIONS, KOLKATA IN THE YEAR 2014. IN THIS BOOK, I EXPRESS MY VIEWS ON CERTAIN PROBLEMS WHICH INDIA IS FACING (OR WILL FACE IN FUTURE).

हिमसागर ठाकुर अभियांत्रिकी (प्रॉडक्शन) शाखेचे पदवीधर आहेत. त्यांनी M.B.Aही केले आहे. त्यांचे ‘HELP YOURSELF’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. आता ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहे (POWER PUBLICATIONS, PURUSHOTTAM BOOKSTORE आणि AMAZON या संकेतस्थळावर). त्या पुस्तकात मी विविध गोष्टींबद्दल माझे मतप्रदर्शन केले आहे. जसे की, मुंबई लोकलमध्ये होणारी गर्दी कशी कमी करता येऊ शकते? भारतात काळा पैसा कशाप्रकारे परत आणता येऊ शकतो? एकत्र कुटुंबाचे फायदे. फ्री (मोफत) वाटत असलेल्या सोशल मीडियावर होणारा खर्च, भारतातील सर्व सरकारी व्यवहार ऑनलाइन कसा आणि का करावा? जनजागृती, काय केल्याने जास्तीत जास्त लोक मतदानाला जाऊ शकतील? भाज्यांचे भाव जास्त का वाढतात? आणि एका वर्षी भाजीला जो भाव मिळतो तोच भाव पुढल्या वर्षी का मिळत नाही? अशा प्रकारच्या विविध विषयांवर मी भाष्य केले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MAHAGAI EK CHAKRAVYUHA Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे... अमरावती-पुणे

जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचनात आले आणि वैदर्भीय भाषेत उत्स्फूर्त प्रतिक्रिया द्यावीशी वाटली ती म्हणजे -`अरे भल्ल्या मस्त आहेत बॉ या गप्पा!` प्रापंचिक, कार्यालयीन कामकाजातील गमतीजमती, आलेले बाका प्रसंग अशा ४५ कथांचा समावेश असलली ही मेजवानी खूपच रुचकर झालेली आहे. त्यात वैदर्भीय भाषेच्या लहेज्याची फोडणी पडल्यामुळे गप्पा अजूनच स्वादिष्ट ! प्रत्येक कथाप्रसंगांना समर्पक शीर्षक हे सुद्धा या पुस्तकाचे वैशिष्ट्ध ! आपल्या व्यक्तिगत जीवनात घडलेल्या गमतीशीर, भावनिक प्रसंगांची आठवण ह्या गप्पा करून देतात. यातील सर्वोत्तम भावनिक साद घालणाऱ्या कथा म्हणजे `गव्हातले खडे` आणि `पुरणामागची वेदना.` लहानपणी सिनेमा बघण्यासाठी पैसे जमवण्याची धडपड अर्थातच `हेराफेरी` वगैरे उत्तमच... मजेशीर... सर्व कथा वाचून पूर्ण झाल्यावर एक विचार मनात आला तो म्हणजे ह्या कथाप्रसंगांचा एक स्वतंत्र `गप्पांच्या मैफिली`चा किंवा `स्टैंड अप कॉमेडी` कार्यक्रम होऊ शकतो. हे पुस्तक वाचकांनी उत्स्फूर्तपणे घेऊन सर्वांनी ह्या गप्पांमध्ये मिसळून जावे हीच विनंती ! जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more