IAN FLEMING

About Author

Birth Date : 28/05/1908


IAN FLEMING WAS BORN ON MAY 28, 1908 IN GREEN STREET, LONDON. HE WAS EDUCATED AT ETON COLLEGE. HE WENT TO GERMANY AND AUSTRIA FOR HIGHER EDUCATION. AFTER INITIALLY WORKING AT REUTERS NEWS AGENCY, HE STARTED WORKING AS A STOCKBROKER IN THE STOCK MARKET. DURING WORLD WAR II, HE WORKED FULL-TIME AS AN ASSISTANT DIRECTOR OF NAVAL INTELLIGENCE.

इयान फ्लेमिंग यांचा जन्म २८ मे, १९०८ रोजी लंडनमधील ग्रीन स्ट्रीट येथे झाला. त्यांचे शिक्षण इटन महाविद्यालायात झाले. उच्चशिक्षणासाठी ते जर्मनी आणि ऑस्ट्रिया येथे गेले. सुरुवातीचा काही काळ रायटर्स न्यूज एजन्सी येथे काम केल्यावर ते शेअर मार्केटमध्ये स्टॉकब्रोकर म्हणून काम करू लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पूर्ण वेळ नौदलातील हेरखात्यात असिस्टंट डायरेक्टर म्हणून ते कार्यरत होते. महायुद्धाच्या नंतर इयान फ्लेमिंग यांनी केम्स्ले , संडे टाइम्स या आणि इतर काही वर्तमानपत्रांसाठी परराष्ट्रीय बातमीदार म्हणून काम केले. १९५२ साली त्यांनी कसिनो रॉयल ही थरारक कादंबरी लिहिली. याच कादंबरीतून त्यांनी जेम्स बाँड – एजंट ००७ हे पात्र जगासमोर आणले. पुढील आयुष्यात त्यांनी जेम्स बाँड या पात्राभोवती गुंफलेल्या तेरा कादंबऱ्या लिहिल्या. या सर्व कादंबऱ्या अत्यंत लोकप्रिय ठरल्या. या कादंबऱ्यावर चित्रपटही निघाले. १९६२ साली हृदयविकाराशी झगडता झगडता त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी – वॅÂस्परसाठी – एका उडणाऱ्या गाडीवर आधारित चिटी चिटी-बँग बँग ही कथा लिहिली. १२ ऑगस्ट, १९६४ साली केंट येथे त्यांचा मृत्यू झाला.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
FROM RUSSIA WITH LOVE Rating Star
Add To Cart INR 250
TBC Classic Book
GOLD FINGER Rating Star
Add To Cart INR 180
TBC Classic Book
OCTOPUSSY Rating Star
Add To Cart INR 120

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more