JOHN GRAY

About Author

Birth Date : 28/12/1951


JOHN GRAY WAS BORN IN 1951 IN HOUSTON, TEXAS. IN 1982, HE RECEIVED HIS DOCTORATE IN PSYCHOLOGY AND HUMAN SEXUALITY FROM COLUMBIA PACIFIC UNIVERSITY. HE WORKED AS A CERTIFIED FAMILY THERAPIST FOR ALMOST FIFTEEN YEARS. HE HAS BEEN CONDUCTING WORKSHOPS ON PERSONALITY DEVELOPMENT FOR OVER THIRTY YEARS.

जॉन ग्रे यांचा जन्म १९५१ साली टेक्सासमधील ह्यूस्टन या गावी झाला. १९८२ साली त्यांनी कोलंबिया पॅसिफिक युनिव्हर्सिटीतून मानसशास्त्र आणि मानवी लैंगिकता या विषयातील डॉक्टरेट मिळवली. एक प्रमाणित कौटुंबिक उपचारक म्हणून ते जवळजवळ पंधरा वर्षे काम करत होते. तीस वर्षांहून अधिक काळ ते व्यक्तिमत्त्व विकसनावर कार्यशाळा घेत आहेत. ते फँमिली जर्नल चे संपादकीय सल्लागार आहेत. संभाषण कौशल्य आणि नातेसंबंध या विषयातील ते आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त तज्ज्ञ मानले जातात. त्यांच्या कार्यशाळा, पुस्तके, सीडीज आणि डीव्हीडीज यांतून ते लोकांचे मनोरंजन तर करतातच; पण आपले संभाषण कौशल्य आणि नातेसंबंध वृद्धिंगत करण्यास प्रेरितही करतात. जॉन ग्रे हे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रिय वक्ते आहेत. टीव्हीवरील अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले आहेत. अनेक नियतकालिकांमध्ये त्यांची माहिती प्रसिद्ध झाली आहे. इंग्लंड, कॅनडा, मेक्सिको, कोरिया यांसारख्या अनेक देशांतील वर्तमानपत्रांत त्यांचे स्तंभलेख छापून येत असतात. त्यांनी आत्तापर्यंत सोळा पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यातील मार्स-व्हीनस मालिकेतील पुस्तकांच्या, जगभरातील पंचेचाळीस भाषांमध्ये मिळून चाळीस दशलक्ष प्रती वाचकांपर्यंत पोचल्या आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
27 %
OFF
JOHN GRAY COMBO OFFER - 3 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1145 INR 840
24 %
OFF
JOHN GRAY COMBO SET - 3 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1145 INR 874
S SUKHACHA Rating Star
Add To Cart INR 295
TO ANI TEE Rating Star
Add To Cart INR 550
TULA ATHAVTANA Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.