KONDAPALLI KOTESWARAMMA

About Author

Birth Date : 05/08/1918
Death Date : 19/09/2018


SHE WORKED ACTIVELY FOR THE COMMUNIST PARTY OF INDIA ALONG WITH HER HUSBAND AND THE LIKES OF PUCHAPALLI SUNDARAIAH. SHE CONTRIBUTED ACTIVELY TO THE TELANGANA REBELLION. SHE WORKED FOR THE PARTY FOR FEW YEARS STAYING UNDERGROUND (IN BANDAR, ELURU, PURI, RAICHUR), AWAY FROM HER FAMILY AND CHILDREN. SHORTLY AFTER THE REBELLION, THE COMMUNIST PARTY DIVIDED INTO TWO. HER HUSBAND DESERTED HER AND SHE WAS LEFT TO FEND FOR HERSELF AND HER CHILDREN. AT THE AGE OF 35, SHE CAME TO HYDERABAD TO STUDY MATRICULATION. SHE SUSTAINED DURING THOSE YEARS THROUGH THE LITTLE MONEY EARNED FROM WRITING STORIES AND PERFORMING FOR THE RADIO. EVEN WHILE SUSTAINING WITH SUCH MEAGRE EARNINGS, SHE USED TO SEND TEN RUPEES EACH TO THE PARTY (CPI AND CPI(M)) FUNDS EVERY MONTH. AFTER COMPLETING HER MATRICULATION, SHE JOINED POLYTECHNIC COLLEGE IN KAKINADA AS A MATRON. SHE STARTED PARTICIPATING IN THE LITERARY EVENTS IN KAKINADA. LATER, SHE WORKED IN VARIOUS COLLEGES ACROSS THE STATE. SHE HAD A DAUGHTER KARUNA AND A SON CHANDRASEKHAR. KARUNA WAS A DOCTOR AND CHANDRASEKHAR STUDIED AT REGIONAL ENGINEERING COLLEGE, WARANGAL. BOTH OF THEM DIED UNDER UNFORESEEN CIRCUMSTANCES. DURING THESE YEARS, HER HUSBAND ESTABLISHED THE PEOPLES WAR PARTY IN INDIA AND WORKED ACTIVELY TOWARDS IT. BUT HE GOT OUSTED LATER ON FROM HIS OWN PARTY AND WAS JAILED. HE SUFFERED MENTAL ILLNESS AND DIED AT THE AGE OF 87 IN HIS GRANDDAUGHTERS (DAUGHTER OF KARUNA) PLACE. KOTESWARAMMA LIVED IN VIJAYAWADA FOR FEW YEARS AND LATER ON MOVED TO CHANDRA RAJEWSARA RAO OLD AGE HOME IN HYDERABAD.

कोंडापल्ली कोटेश्वराम्मा ह्या आंध्रप्रदेशातील माओवादी चळवळीचे दिवंगत प्रणेते श्री. सीतारामय्या कोंडापल्ली यांच्या पत्नी म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी स्वत: राजकीय कार्यकत्र्या म्हणून बरीच वर्षे काम केलेले आहे. त्यांनी लिहिलेल्या तेलुगू कथा आणि कवितासंग्रह देखील प्रकाशित झाले आहेत. जवळपास शंभर वर्षांचे आयुष्य लाभलेल्या कोटेश्वराम्मांनी वयाच्या ९२व्या वर्षी निर्जन वारधी या नावाने आपले आत्मवृत्त लिहिले. २०१२ मध्ये हे आत्मवृत्त प्रकाशित झाले आणि २०१८ मध्ये कोटेश्वराम्मांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची जीवनकहाणी म्हणजे आंध्र प्रदेशातील महत्त्वाच्या सामाजिक, राजकीय चळवळीतील भेदक अनुभवांची गाथाच आहे. स्वातंत्र्य आंदोलन, कम्युनिस्ट आंदोलन, तेलंगणाचा सशस्त्र लढा, नक्षलबारी या सर्वांचा यात समावेश आहे. त्यांच्या या अनुभवांना एक बाल विधवा, देशातील सर्वांत जहाल कम्युनिस्ट आंदोलनातील कार्यकर्ती, सर्वांत प्रभावी नेत्याची पत्नी, एक स्वतंत्र विचारसरणीची प्रतिभावान स्त्री आणि याशिवाय एक आई, आज्जी असे अनेक पदर आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
NIRJAN POOL Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more