LEENA DAMALE

About Author

Birth Date : 04/08/1959


INDIAS PARTICIPATION IN THE STARS OF ASIA PROJECT HELD IN JAPAN-TOKYO. THE PROJECT COLLECTED MYTHOLOGICAL STORIES RELATED TO ASTRONOMY IN ASIAN COUNTRIES. BOOKS ON THIS ARE PUBLISHED IN ENGLISH AND OTHER ASIAN LANGUAGES.

एम. एस्सी. (न्युक्लिअर फिजिक्स) जर्मन भाषा (सर्टिफिकेट कोर्स - ३ वर्षे) लीना दामले यांनी माहेर , मानिनी , स्त्री , किर्लोस्कर व गृहशोभा ह्या लोकप्रिय मासिकांमधून लघुकथा आणि उद्याची पिढी आणि टीनातली मुले याविषयांवर माहेर ह्या मासिकामधून लेख मालिका प्रकाशित केल्या आहेत. पुरुषस्य:चरित्रम निवडक मराठी लघुकथासंग्रह, प्रपंच प्रकाशन (२००४) त्याशिवाय ताऱ्यांची जीवन कथा मालिका, लोकसत्ता (२००५) आणि लहान मुलांसाठी खगोलशास्त्रावर आधारित मालिका, सकाळ (२००२) च्या सदरात प्रकाशित. आकाशमित्र पुणे, खगोलशास्त्र विषयक संस्थेच्या सदस्या. २००५ साली कथारुपी खगोलशास्त्र , ह्या पुस्तकाची मेहता पब्लिशिंग हाऊसची प्रथमावृत्ती लगेच संपली व २००८ साली द्वितीय आवृत्ती प्रकाशित झाली. २००६ साली ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (बालसाहित्य) मिळाला. साहित्य प्रेमी भगिनी मंडळ , पुणे या संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या. विज्ञान मंथन विज्ञान मालिका, विपुलश्री मासिकातून (२००८) प्रसिद्ध. जपान-टोकियोमध्ये झालेल्या स्टार्स ऑफ एशिया प्रकल्पात भारताच्यावतीने सहभाग. प्रकल्पाद्वारे एशियाई देशांतील खगोलशास्त्राशी निगडीत पौराणिक कथांचा संग्रह करण्यात आला. इंग्लिश आणि अन्य एशियाई भाषांमध्ये यावर पुस्तके प्रसिद्ध.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
ANTARIKSHACHYA ANTRANAGAT Rating Star
Add To Cart INR 180
ASHAKYA BHAUTIKI Rating Star
Add To Cart INR 350
KATHARUPI KHAGOLSHASTRA Rating Star
Add To Cart INR 170
NATE BRAHMANDACHE Rating Star
Add To Cart INR 550

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more