LEILA ABOULELA

About Author


LEILA ABOULELA IS A FICTION WRITER OF SUDANESE ORIGIN, WHO LIVES IN GREAT BRITAIN AND WRITES IN ENGLISH. HER MOST RECENT BOOKS ARE THE NOVEL BIRD SUMMONS AND THE SHORT-STORY COLLECTION ELSEWHERE, HOME, WHICH WAS THE WINNER OF THE 2018 SALTIRE FICTION BOOK OF THE YEAR AWARD. HER NOVEL THE KINDNESS OF ENEMIES WAS INSPIRED BY THE LIFE OF IMAM SHAMIL WHO UNITED THE TRIBES OF THE CAUCASUS TO FIGHT AGAINST RUSSIAN IMPERIAL EXPANSION. ABOULELAS 2011 NOVEL, LYRICS ALLEY, WAS FICTION WINNER OF THE SCOTTISH BOOK AWARDS AND SHORT-LISTED FOR A REGIONAL COMMONWEALTH WRITERS PRIZE. SHE IS ALSO THE AUTHOR OF THE NOVELS THE TRANSLATOR (A NEW YORK TIMES 100 NOTABLE BOOK OF THE YEAR) AND MINARET.

लेइला अबोउलेला या सुदानी वंशाच्या इंग्रजी लेखिका आहेत. त्या ग्रेट ब्रिटन येथे वास्तव्यास आहेत. 2019 मध्ये त्यांची बर्ड समन्स कादंबरी प्रकाशित झाली आहे. तर एल्सव्हेअर होम हा त्यांचा कथासंग्रह 2018 सालच्या सोलटायर फिक्शन बुक ऑफ द इयरने सन्मानित आहे. रशियन वसाहतवादाविरोधात लढा देणाऱ्या इमाम शामील यांच्या जीवनापासून प्रेरित असलेली त्यांची काइंडनेस ऑफ एनीमिज ही कादंबरीही विशेष लोकप्रिय आहे. लिरिक्स आली ही त्यांची कादंबरी स्कॉटिश बुक अवार्ड विजेती असून त्यांची द ट्रान्सलेटर कादंबरी न्यू यॉर्क टाइम्सच्या शंभर लक्षवेधी पुस्तकांच्या यादीत समाविष्ट आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DUR GHAR MAJHE Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more