MADHAV KARVE

About Author

Birth Date : 05/08/1956


MADHAV KARVE – BIRTH DATE 5TH AUGUST 1956 WITH BACKGROUND OF ENGLISH LITERATURE GRADUATION AND FURTHER POST-GRADUATION IN MARATHI, STARTED WRITING ALL KINDS OF CONTENT FROM SHORT STORIES TO BOOK REVIEWS IN DAILIES LIKE `SAKAL’, ‘KESARI’ ETC. VERY SOON, HE STARTED WORKING AS A JOURNALIST. FURTHER, HE EDITED A PERIODICAL FOR THE DISABLED, CALLED ‘APANG VARTA’ FOR ‘APANG SAHAYYAKARI SANSTHA’ FOUNDED BU DR. W. N. TUNGAR. AFTER INTRODUCTION WITH BENGALI, HE TRANSLATED SHORT STORIES BY AUTHOR FROM O. HENRY TO ERNEST HEMINGWAY AS WELL. MEANWHILE, HE TRANSLATED SOME BESTSELLERS OF MEHTA PUBLISHING HOUSE’ LIKE DISCLOSURE (MICHAEL CRICHTON), GOLDFINGER (IAN FLEMING), ‘THE CLIENT’ (JOHN GRISHAM), ‘SAVING FAITH (DAVID BALDACCI), WHERE EAGLES DARE (ALLASTAIR MACLEAN) ETC. HE HAS TO HIS CREDIT, TRANSLATION OF SOME BESTSELLERS BY SYDNEY SHELDON AND DAVID BALDACCI AS WELL AS AUTOBIOGRAPHICAL BOOK BY HELEN KELLER (THE STORY OF MY LIFE) PUBLISHED BY ITHER PUBLISHERS. HE HAS WORDED TWO BOOKS, I.E. AUTOBIOGRAPHY OF DR. W. N. TUNGAR (KAHANI ATHAK JIDDICHI) AND ADVENTUROUS SCOOTER-BIKE EXPEDITION TO KHARDUNGLA BY RAJENDRA KHANDELWAL ( GADUDBHARARI)

माधव कर्वे यांचं इंग्लिश साहित्याचं पदवी पर्यंतच शिक्षण आणि पुढे मराठी भाषेतल्या पदव्युत्तर शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर दै . सकाळ, केसरी आणि इतरत्र कथांपासून पुस्तक परिचयापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनाने शुभारंभ झाला. पुढे स्वतः पत्रकार म्हणून काम करताना दुसरीकडे अपंगांच्या क्षेत्रातले अपंग पुनर्वसन तज्ज्ञ डॉ. वा. ना. तुंगार ह्यांच्या अपंग साहाय्यकारी संस्थेच्या अपंगवार्ता या त्रैमासिकाचं दीर्घकाळ संपादन केलं. दरम्यान बंगाली भाषेची ओळख झाल्यानंतर बंगाली साहित्यातील कथांचे अनुवाद प्रसिद्ध झाले. इंग्लिश साहित्यातल्या ओ हेन्री पासून अर्नेस्ट हेमिंग्वे सारख्या कथाकारांच्या कथांचे अनुवादही प्रसिद्ध होत राहिले. ह्याचवेळी दुसरीकडे मेहता पब्लिशिंग हाऊससाठी डिस्क्लोजर (मायकेल क्रिश्टन ), द क्लायंट (जॉन ग्रिशॅम ), गोल्डफिंगर (इयान फ्लेमिंग ), सेव्हिंग फेथ (डेव्हिड बलडासी ) इ. बेस्टसेलर कादंबऱ्यांचे आणि अन्य काही पुस्तकांचे अनुवाद केले. आत्तापर्यंत अन्य प्रकाशकांनी सिडने शेल्डन आणि डेव्हिड बलडासी ह्या नामवंत बेस्टलेखकांच्या कादंबऱ्यांच्या अनुवादाबरोबरच अपंगांचं स्फूर्तिस्थान असलेल्या हेलन केलर ह्यांच्या द स्टोरी ऑफ माय लाईफ ह्या आत्मकथनाचा अनुवाद अशी पुस्तक प्रसिद्ध केली आहेत. ह्याशिवाय अपंगांच्या प्रश्नासंबंधी आत्त्तापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखनामध्ये डॉ. वा. ना. तुंगार ह्यांचं आत्मचरित्र (कहाणी अथक जिद्दीची ) तसंच राजेंद्र खंडेलवाल ह्यांनी अपंग बांधवाना प्रेरित करण्याच्या हेतूने स्कूटर वरून केलेल्या खारदूंगला साहस सफारीसंबंधित गरुडभरारी ह्या पुस्तकांच्या शब्दांकनाचा समावेश होतो.
Sort by
Show per page
Items 1 to 9 of 9 total
DHYANSUTRA Rating Star
Add To Cart INR 240
DISCLOSURE Rating Star
Add To Cart INR 450
TBC Classic Book
GOLD FINGER Rating Star
Add To Cart INR 180
TBC Classic Book
KATHA SWATANTRYALADHYACHYA Rating Star
Add To Cart INR 120
PUPPET ON A CHAIN Rating Star
Add To Cart INR 220
TBC Classic Book
SAVING FAITH Rating Star
Add To Cart INR 400
TBC Classic Book
STILL LIFE Rating Star
Add To Cart INR 400
TBC Classic Book
THE CLIENT Rating Star
Add To Cart INR 350
TBC Classic Book
WHERE EAGLES DARE Rating Star
Add To Cart INR 350
TBC Classic Book

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more