MADHAVI DESAI

About Author

Birth Date : 21/07/1933
Death Date : 15/07/2013


MADHAVI DESAI WAS BORN IN KOLHAPUR, BUT SPENT MOST OF HER LIFE IN GOA. PRODUCER OF MARATHI FILMS AND DADASAHEB PHALKE AWARD WINNER KAI. BHALJI PENDHARKAR IS HIS FATHER. MADHAVITAR GOT THE HERITAGE OF ART AND LITERATURE FROM THE FAMILY ITSELF.

माधवी देसाई यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला, पण त्यांनी आपल्या आयुष्याचा बराच काळ गोव्यामध्येच व्यतीत केला. मराठी चित्रपटांचे निर्माते आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते कै. भालजी पेंढारकर हे त्यांचे वडील. माधवीतार्इंना कलेचा, साहित्याचा वारसा घराण्याकडूनच मिळाला. माधवीतार्इंनी जवळ-जवळ १६ वर्षे शिक्षणक्षेत्रात काम केले. नंतर त्या गोव्यामध्ये वास्तव्यास गेल्या. त्या २५ वर्षे तेथे राहिल्या. आपल्या साहित्यिक कारकिर्दीचा प्रारंभही त्यांनी तेथेच केला. अखिल गोवा साहित्य संमेलनाची स्थापनाही त्यांनी केली. त्यांनी जवळ-जवळ ३८ पुस्तके लिहिली. नाच ग घुमा या त्यांच्या आत्मचरित्राला यशो दामिनी हा साहित्य पुरस्कारही मिळाला. प्रतारणा व सीमारेषा या त्यांच्या पुस्तकांना कला अ‍ॅकॅडमी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. देवराई, जगावेगळी, नियती, कांचनगंगा, मंजिरी, प्रार्थना, हरवलेल्या वाटा, स्वयंसिद्धा आम्ही, शाल्मली, आवतन या त्यांच्या कादंबऱ्याही खूप गाजल्या. असं म्हणू नकोस, कथा सावलीची, सागर, किनारा, शुक्रचांदणी हे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी घे भरारी या चित्रपटासाठी पटकथा व संवाद लेखनही केले. या चित्रपटाला अल्फा गौरव अ‍ॅवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 12 total
ASA MHANU NAKOS Rating Star
Add To Cart INR 170
DHUMARE Rating Star
Add To Cart INR 130
HARAVALELYA WATA Rating Star
Add To Cart INR 120
KANCHANGANGA Rating Star
Add To Cart INR 220
KATHA SAWALICHI Rating Star
Add To Cart INR 190
KINARA Rating Star
Add To Cart INR 120
28 %
OFF
MADHAVI DESAI COMBO 11 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1670 INR 1199
MANJIRI Rating Star
Add To Cart INR 150
NIYATI Rating Star
Add To Cart INR 120
PRARTHANA Rating Star
Add To Cart INR 220
SAGAR Rating Star
Add To Cart INR 100
SHUKRACHANDANI Rating Star
Add To Cart INR 130

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे... अमरावती-पुणे

जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचनात आले आणि वैदर्भीय भाषेत उत्स्फूर्त प्रतिक्रिया द्यावीशी वाटली ती म्हणजे -`अरे भल्ल्या मस्त आहेत बॉ या गप्पा!` प्रापंचिक, कार्यालयीन कामकाजातील गमतीजमती, आलेले बाका प्रसंग अशा ४५ कथांचा समावेश असलली ही मेजवानी खूपच रुचकर झालेली आहे. त्यात वैदर्भीय भाषेच्या लहेज्याची फोडणी पडल्यामुळे गप्पा अजूनच स्वादिष्ट ! प्रत्येक कथाप्रसंगांना समर्पक शीर्षक हे सुद्धा या पुस्तकाचे वैशिष्ट्ध ! आपल्या व्यक्तिगत जीवनात घडलेल्या गमतीशीर, भावनिक प्रसंगांची आठवण ह्या गप्पा करून देतात. यातील सर्वोत्तम भावनिक साद घालणाऱ्या कथा म्हणजे `गव्हातले खडे` आणि `पुरणामागची वेदना.` लहानपणी सिनेमा बघण्यासाठी पैसे जमवण्याची धडपड अर्थातच `हेराफेरी` वगैरे उत्तमच... मजेशीर... सर्व कथा वाचून पूर्ण झाल्यावर एक विचार मनात आला तो म्हणजे ह्या कथाप्रसंगांचा एक स्वतंत्र `गप्पांच्या मैफिली`चा किंवा `स्टैंड अप कॉमेडी` कार्यक्रम होऊ शकतो. हे पुस्तक वाचकांनी उत्स्फूर्तपणे घेऊन सर्वांनी ह्या गप्पांमध्ये मिसळून जावे हीच विनंती ! जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more

Rajendra Ramchandra Patil

Our earth on the Greatest King and Hindu religion and temple protect.Hindvee swarajay ..!!! The great warrior Mahamrutanjay yodha, Chhawa,ajiky Shrimant Chhatrapati Shambhu Maharaj