MAJOR GENERAL IAN CARDOZO

About Author

Birth Date : 07/08/1937




मेजर जनरल इयान कारडोझो यांचा जन्म मुंबईत झाला. सेंट झेवियर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर, जुलै १९५४ मध्ये ते क्लेमेंट टाउन, डेहरादून येथे जॉइंट सव्र्हिसेस विंगमध्ये सामील झाले. पुढे १९५५ मध्ये पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये त्याचे रूपांतर झाले. इथे ते सर्वोत्तम कामगिरीसाठी सुवर्णपदक प्राप्त करणारे पहिले कॅडेट ठरले तर, मेरीटमध्ये प्रथम आल्याबद्दल त्यांना रौप्य पदका ने गौरविण्यात आले. पुढे ते भारतीय सैन्य अकादमीमध्ये, पाचव्या गोरखा रायफल्स (फ्रंटीयर फोर्स) मध्ये लेफ्टनंट म्हणून भरती झाले. इथेही ते सेना पदक प्राप्त करणारे पहिले अधिकारी ठरले. १९७१ मध्ये बांगलादेशातील सिल्हेट येथे झालेल्या युद्धात ते जखमी झाले. स्वत:च्या गंभीर जखमांची पर्वा न करता त्यांनी स्वत: आपला पाय कुकरी ने कापला आणि त्यानंतर आलेल्या अपंगत्वावर मात करून भारतीय लष्करात, घोडदळ पलटण सांभाळण्यासाठी नियुक्त झालेले ते पहिले अपंग अधिकारी ठरले. त्यांनी पुढील सेवा कृत्रिम पाय वापरून सुरु ठेवली. १९९३ मध्ये ते चीफ ऑफ अ स्टाफ या पदावरून निवृत्त झाले. २००९ ते २०१४ पर्यंत ते भारतीय पुनर्वसन परिषदेचे अध्यक्ष होते. सध्या ते सामाजिक कार्यकर्ते, लेखक म्हणून कार्य करत आहेत तसेच द स्पास्टीक्स सोसायटी ऑफ नॉर्दर्न इंडियाच्या सोबत अपंग क्षेत्रातही कार्यरत आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
PARAMVEER CHAKRA Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more