MANJUSHRI GOKHALE

About Author

Birth Date : 21/11/1957


MRS. MANJUSHRI GOKHALE HAS COMPLETED HER MASTERS IN MARATHI LANGUAGE ALONG WITH B.ED. IN MARATHI AND HINDI. SHE HAS TEACHING EXPERIENCE IN COLLEGES AND HAS DELIVERED VARIOUS LECTURES ON ‘SAINT LITERATURE’ IN NUMBERS OF CITIES. HER ARTICLES AND RESEARCH WORK HAS BEEN PUBLISHED IN VARIOUS NEWSPAPERS. A TOTAL OF 30 BOOKS PUBLISHED. VARIOUS AWARDS ARE WON BY HER NOVELS AND STORIES AND BOOKS. HER BOOK ‘TUKAYACHI AVALI’ NEEDS A SPECIAL MENTION AS IT IS DECLARED THE BEST NOVEL IN VARIOUS CITIES AND HAS WON PRESIDENT’S AWARD, AND IS ALSO A PART OF THE CURRICULUM OF MASTERS’ DEGREE FOR ARTS.

इचलकरंजीतील द मॉडर्न हायस्कुलमध्ये सहायक शिक्षिका म्हणून, तर कोल्हापूरमधील महाराष्ट्र हायस्कुल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापिका म्हणून कार्यभार सांभाळला आहे. कादंबऱ्या, कथासंग्रह, कवितासंग्रह, पाकशास्त्र, प्रवसावर्णन वगैरे वेगवेगळ्या साहित्यप्रकारात त्यांनी लेखन केले आहे. त्यांची २५ पुस्तके प्रकाशित आहेत. शिशिरसांज, रानगंध या नावाने त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. फुलपाखरांचा गाव आणि आकृतीगंध ही दोन चारोळ्यांची पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. स्वस्तिकाची फुले, हास्यमेव जयते, बुफे आणि फेफ आणि ओंजळीतले मोती या कथासंग्रहांचे त्यांनी लेखन केले आहे. अंधाराच्या सावल्या, अग्निलाघव या रहस्यकथासंग्रहाबरोबरच रंगपश्चिमा हे प्रवासवर्णनही प्रसिद्ध झाले आहे. फास्ट-ब्रेकफास्ट नावाचे पाककृतींवर आधारित पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. अमृतसंदेश माहात्म्य या आध्यात्मिक पुस्तकाच्या लिखाणाव्यतिरिक्त त्यांनी सासूची माया या मराठी चित्रपटासाठी कथा-पटकथा व संवादलेखनही केले आहे. अरुण दाते यांचा शुक्रतारा आणि शब्दसुरांच्या झुल्यावर या कार्यक्रमांमध्ये त्यांनी निवेदन केले आहे. तुकयाची आवली या कादंबरीला २००८मध्ये तुका म्हणे पुरस्कार आणि भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील वाचनवेध पुरस्कार जोहार मायबाप जोहार या पुस्तकाला खामगाव येथील कै. वरणगावकर स्मृतिपुरस्कार २०१२, संत गाडगेमहाराज अध्यासन पुरस्कार २०१४, तसेच ज्ञानसुर्याची सावली या कादंबरीला अश्वमेध ग्रंथालय आयोजित अक्षरगौरव पुरस्कार २०१४, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे किर्तन संजीवनी पुष्पलता रानडे पारितोषिक २०१६ मिळाले आहे. जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या वर्षातील सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांचा अशोक देवदत्त टिळक पुरस्कार समर्पण या संत जनाबाई यांच्यावरील चरित्रात्मक कादंबरीस जाहीर.
Sort by
Show per page
Items 1 to 11 of 11 total
AAKASH ZELTANA Rating Star
Add To Cart INR 195
BHAKTICHANDRA Rating Star
Add To Cart INR 480
DNYANSURYACHE AKASH Rating Star
Add To Cart INR 450
DNYANSURYACHI SAWALI Rating Star
Add To Cart INR 300
DOSTI, DUNIYADARI AUR DIL Rating Star
Add To Cart INR 220
HECHI DAAN DEGA DEVA Rating Star
Add To Cart INR 450
JOHAR MAI BAAP JOHAR Rating Star
Add To Cart INR 320
26 %
OFF
MANJUSHREE GOKHALE COMBO SET -11 BOOKS Rating Star
Add To Cart INR 3700 INR 2747
OMKARACHI REKH JANA Rating Star
Add To Cart INR 320
SAMARTH Rating Star
Add To Cart INR 450
TUKAYACHI AAWALI Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more