MANJUSHRII GOKHALE

About Author

Birth Date : 21/11/1957


इचलकरंजीतील द मॉडर्न हायस्कुलमध्ये सहायक शिक्षिका म्हणून, तर कोल्हापूरमधील महाराष्ट्र हायस्कुल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापिका म्हणून कार्यभार सांभाळला आहे. कादंबऱ्या, कथासंग्रह, कवितासंग्रह, पाकशास्त्र, प्रवसावर्णन वगैरे वेगवेगळ्या साहित्यप्रकारात त्यांनी लेखन केले आहे. त्यांची २५ पुस्तके प्रकाशित आहेत. शिशिरसांज, रानगंध या नावाने त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. फुलपाखरांचा गाव आणि आकृतीगंध ही दोन चारोळ्यांची पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. स्वस्तिकाची फुले, हास्यमेव जयते, बुफे आणि फेफ आणि ओंजळीतले मोती या कथासंग्रहांचे त्यांनी लेखन केले आहे. अंधाराच्या सावल्या, अग्निलाघव या रहस्यकथासंग्रहाबरोबरच रंगपश्चिमा हे प्रवासवर्णनही प्रसिद्ध झाले आहे. फास्ट-ब्रेकफास्ट नावाचे पाककृतींवर आधारित पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. अमृतसंदेश माहात्म्य या आध्यात्मिक पुस्तकाच्या लिखाणाव्यतिरिक्त त्यांनी सासूची माया या मराठी चित्रपटासाठी कथा-पटकथा व संवादलेखनही केले आहे. अरुण दाते यांचा शुक्रतारा आणि शब्दसुरांच्या झुल्यावर या कार्यक्रमांमध्ये त्यांनी निवेदन केले आहे. तुकयाची आवली या कादंबरीला २००८मध्ये तुका म्हणे पुरस्कार आणि भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील वाचनवेध पुरस्कार जोहार मायबाप जोहार या पुस्तकाला खामगाव येथील कै. वरणगावकर स्मृतिपुरस्कार २०१२, संत गाडगेमहाराज अध्यासन पुरस्कार २०१४, तसेच ज्ञानसुर्याची सावली या कादंबरीला अश्वमेध ग्रंथालय आयोजित अक्षरगौरव पुरस्कार २०१४, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे किर्तन संजीवनी पुष्पलता रानडे पारितोषिक २०१६ मिळाले आहे.

Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SAMARPAN Rating Star
Add To Cart INR 295

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more