MARIJA SRES

About Author


MARIJA SRES (BN 1943) IS A RELIGIOUS NUN FROM BRATONCI, SLOVENIA. FOR THIRTY YEARS SHE HAS WORKED WITH THE DUNGRI GARASIYA BHILS OF GUJARAT. MARIJAS PREVIOUS BOOKS ON GUJARATI TRIBAL WOMEN HAVE BEEN TRANSLATED IN ENGLISH, SLOVENE, SPANISH, GUJARATI, AND MARATHI.

मारिजा स्रेस यांचा जन्म युगोस्लाव्हियात एका रोमन कॅथॉलिक कुटुंबात झाला. त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली. काही काळ स्पेनमध्ये केलेल्या वास्तव्यात वेगवेगळ्या देशांबद्दल माहिती करून घेतल्यानंतर सामाजिक कार्य हे स्वतःचं ध्येय ठरवून त्यांनी भारतात येण्याचं नक्की केलं. वयाच्या २८व्या वर्षी त्या भारतात येऊन पोहोचल्या. गुजरातच्या दुष्काळी भागात काम करायला गेलेल्या असताना, तेथील एकूण दयनीय अवस्था (रस्ते नाहीत, वीज नाही, सगळीकडे प्रचंड धूळ, गरिबी, उपासमार आणि सामाजिक शोषण!) त्यांनी पाहिली. येथील स्थानिक लोकांमध्ये मिसळायचं असेल तर त्यांची भाषा आली पाहिजे, हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा त्यांनी अहमदाबादच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून गुजराती भाषेत पदवी प्राप्त केली. १९७६मध्ये साबरकांठा जिल्ह्याच्या भिलोडा तालुक्यातील लुसाडिया गावी त्या जाऊन राहिल्या. अविश्रांत परिश्रम घेऊन स्थानिक आदिवासी लोकांचा विश्वास संपादन केला. येथील स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं, तरच परिस्थती सुधारेल असं त्यांना वाटलं आणि त्यांनी स्त्रीसंघटना उभी केली. त्या स्त्रियांना लिहायला, वाचायला शिकवलं. लुसाडिया आणि आसपासच्या खेड्यांमध्ये त्यांनी तिथल्या स्त्रियांचं जे आयुष्य पाहिलं, त्यांचे अनुभव, मारिजा यांना स्वत:ला करावे लागलेले प्रयत्न यांच्या कथा या सर्वांमधून त्यांनी गिरीसमां एक डुंगरी – गहाण पडलेली टेकडी - हे पुस्तक लिहिलं.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
GAHAN PADLELI TEKADI Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.