MARIO PUZO

About Author

Birth Date : 15/10/1920
Death Date : 02/07/1999


MARIO PUZO WAS BORN IN MANHATTAN, NEW YORK. HE GAINED FAME AS AN AMERICAN AUTHOR AND SCREENWRITER. HE COMPLETED HIS GRADUATION FROM THE CITY COLLEGE OF NEW YORK. HE JOINED MILITARY SERVICE FOR LIVELIHOOD. HE ALSO SERVED IN THE US AIR FORCE DURING WORLD WAR II.

मारिओ पुझो यांचा जन्म न्यूयॉर्क मधील मॅनहॅटन येथे झाला. अमेरिकन लेखक आणि पटकथा-लेखक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. न्यूयॉर्क सिटी कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. उपजीविकेसाठी ते लष्करीसेवेत दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन वायूसेनेच्यावतीने सहभागी होऊन त्यांनी कामही केले. पण दृष्टिदोषामुळे त्यांना लवकरच तेथून माघार घ्यावी लागली. त्यातूनच त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षीच आपण लेखक होणार असल्याचे जाहीर केले होते. १९५०-६० च्या दशकात पुझो यांनी एका प्रकाशनसंस्थेत लेखक/संपादक म्हणूनही काम केले. द डार्क एरिना ही त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर द फॉच्र्युनेट पिलग्रिम ही दुसरी कादंबरीही गाजली. पण पुझो यांना खऱ्या अर्थाने यश मिळवून दिलं ते त्यांच्या जगप्रसिद्ध द गॉडफादर या कादंबरीने! या कादंबरीच्या १९६९ साली प्रसिद्ध झालेल्या पेपरबॅक आवृत्तीने त्यांना चार लाख दहा हजार डॉलरचे आगाऊ मानधन मिळवून दिले. हे त्या काळातील लेखकांना मिळालेले सर्वाधिक मानधन होते. गुन्हेगारी विश्वातील माफियांवर आधारित द गॉडफादर ही त्यांची कादंबरी तर जगप्रसिद्ध ठरली! याच कादंबरीवर आधारित फ्रान्सिस फोर्ड कोप्पोला यांच्या सहकार्याने बनविलेल्या, चित्रपटाला सर्वश्रेष्ठ रुपांतरित पटकथेसाठी असलेला अ‍ॅकॅडमी पुरस्कारा ने (१९७२ व १९७४ साली) सन्मानित करण्यात आले. पण त्यावर आधारित द गॉडफादर या चित्रपटानेही घवघवीत यश मिळविले. या चित्रपटाला अ‍ॅकॅडमी पुरस्काराच्या ११ विभागात नामांकन मिळाले होते. त्यापैकी तीन विभागात त्यांना पुरस्कार मिळाले. सर्वश्रेष्ठ रुपांतरित पटकथेसाठी ऑस्कर अ‍ॅवॉर्डसही मारीओ पुझो यांना मिळाले.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
OMERTA Rating Star
Add To Cart INR 250
TBC Classic Book
THE LAST DON Rating Star
Add To Cart INR 595
TBC Classic Book

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.