MARK CHANNON

About Author

Birth Date : 28/11/1948


MARK CHANNON (LONDON, UK) ORIGINALLY TRAINED AS AN ACTOR, BEFORE BECOMING ONE OF THE FIRST 8 PEOPLE IN THE WORLD TO BECOME A GRAND MASTER OF MEMORY IN THE 1995 WORLD MEMORY CHAMPIONSHIPS. HE HAS WORKED AS A TRAINER AND COACH FOR OVER 15 YEARS, RUNNING SEMINARS FOR ORGANIZATIONS SUCH AS ROTHSCHILD, LINCOLN NATIONAL AND THE BBC IN MEMORY, MIND MAPPING AND CREATIVITY. HE IS ALSO A PRODUCT MANAGER FOR THE BBC AND HAS CREATED SEVERAL SHOWS, INCLUDING A MEMORY GAME SHOW.

सन १९९५च्या वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिपमध्ये ग्रँड मास्टर ऑफ मेमरी म्हणून गौरव प्राप्त होण्यापूर्वी मार्क शॅनन यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते. जागतिक स्तरावरील आस्थापना आणि संस्थांसाठी चर्चासत्रांच्या माध्यमातून एक प्रशिक्षक आणि तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी १५ वर्षांपेक्षा अधिक काळ कार्य केले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
GURUKILLI SMARANSHAKTICHI Rating Star
Add To Cart INR 320

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे... अमरावती-पुणे

जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचनात आले आणि वैदर्भीय भाषेत उत्स्फूर्त प्रतिक्रिया द्यावीशी वाटली ती म्हणजे -`अरे भल्ल्या मस्त आहेत बॉ या गप्पा!` प्रापंचिक, कार्यालयीन कामकाजातील गमतीजमती, आलेले बाका प्रसंग अशा ४५ कथांचा समावेश असलली ही मेजवानी खूपच रुचकर झालेली आहे. त्यात वैदर्भीय भाषेच्या लहेज्याची फोडणी पडल्यामुळे गप्पा अजूनच स्वादिष्ट ! प्रत्येक कथाप्रसंगांना समर्पक शीर्षक हे सुद्धा या पुस्तकाचे वैशिष्ट्ध ! आपल्या व्यक्तिगत जीवनात घडलेल्या गमतीशीर, भावनिक प्रसंगांची आठवण ह्या गप्पा करून देतात. यातील सर्वोत्तम भावनिक साद घालणाऱ्या कथा म्हणजे `गव्हातले खडे` आणि `पुरणामागची वेदना.` लहानपणी सिनेमा बघण्यासाठी पैसे जमवण्याची धडपड अर्थातच `हेराफेरी` वगैरे उत्तमच... मजेशीर... सर्व कथा वाचून पूर्ण झाल्यावर एक विचार मनात आला तो म्हणजे ह्या कथाप्रसंगांचा एक स्वतंत्र `गप्पांच्या मैफिली`चा किंवा `स्टैंड अप कॉमेडी` कार्यक्रम होऊ शकतो. हे पुस्तक वाचकांनी उत्स्फूर्तपणे घेऊन सर्वांनी ह्या गप्पांमध्ये मिसळून जावे हीच विनंती ! जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more