MATHUR BHAKTI

About Author

Birth Date : 07/11/1972


BHAKTI MATHUR, PRIVATE BANKER BY DAY, MOTHER TO TWO KIDS AND AN AVID DELVER IN INDIAN MYTHOLOGY AT ALL OTHER TIMES IS THE CREATOR OF THE AMMA TELL ME BOOKS - A SERIES OF PICTURE BOOKS ABOUT INDIAN FESTIVALS AND MYTHOLOGY FOR CHILDREN IN THE THREE TO NINE YEAR AGE GROUP. SHE WROTE AND SELF-PUBLISHED HER FIRST BOOK, AMMA TELL ME ABOUT HOLI! IN 2011 AND OVER THE NEXT 3 YEARS, THE SERIES HAS GROWN WITH BOOKS ON THE FESTIVAL OF DIWALI, THE HINDU EPIC RAMAYANA AND STORIES ABOUT THE HINDU GODS, KRISHNA, GANESHA AND HANUMAN. THE REAL MOTIVATION FOR WRITING THE AMMA TELL ME SERIES WAS TO SHARE WITH MY SONS THE FASCINATING STORIES FROM INDIAN MYTHOLOGY THAT I HAD GROWN UP WITH, SAYS BHAKTI. BHAKTI STUDIED AT MODERN SCHOOL VASANT VIHAR. SHE OBTAINED HER GRADUATE DEGREE IN ECONOMICS AND HER POST GRADUATE DEGREE IN FINANCE FROM DELHI UNIVERSITY. SHE IS A CFA CHARTER HOLDER. AN AVID READER, A LONG-DISTANCE RUNNER AND A YOGA ENTHUSIAST, WHEN NOT WORKING OR RUNNING AFTER HER BOYS, SHE IS HAPPIEST CURLED UP WITH A BOOK AND A HOT CUP OF TEA. FOR MORE INFORMATION PLEASE VISIT WWW.BHAKTIMATHUR.COM

‘अम्मा, टेक मी...’ या पुस्तकमालिकेपासून भक्ति माथुर यांनी २०१० मध्ये लेखनाच्या प्रांतात पहिलं पाऊल टाकलं. मुलांना भारतीय उत्सव, पुराण आणि परंपरा यांची ओळख करून देणारी ही रंजक पुस्तक मालिका आहे. बँकर म्हणून दीर्घकाळ काम केल्यानंतर आता भक्ती माथुर लेखनात, आपल्या आवडीच्या ‘फिटनेस’च्या क्षेत्रात, लांब पल्ल्याच्या धावण्याच्या सरावात रमल्या आहेत. पती, दोन मुले आणि हो, दोन कुत्रे या त्यांच्या कुटुंबीयांबरोबर त्या हाँगकाँगमध्ये आनंदाने वास्तव्य करत आहेत. त्या जेव्हा लिहिणं आणि मुलांमागे धावणं या दोन कामांत गुंतलेल्या नसतात, तेव्हा ‘एका हातात गरमागरम चहाचा कप आणि एका हातात आवडतं पुस्तक’ हा त्यांचा विरंगुळा असतो. त्यांच्याबद्दल आणखी काही जाणून घ्यायचं असेल, तर त्यांना WWW. BHAKTIMATHUR.COM वर जरूर भेटा.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
AMMA , MALA SHIRDILA GHEUN CHAL Rating Star
Add To Cart INR 195
AMMA, CHAL TIRUPATILA JAU Rating Star
Add To Cart INR 195
AMMA, MALA SALIM CHISTINCHYA DARGYAL... Rating Star
Add To Cart INR 195
AMMA, MALA SUVARNA MANDIR DAKHAV Rating Star
Add To Cart INR 195

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more